Wednesday, October 7, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सोलापूरात मूक मोर्चाशि;वरे घटनेतील दोषींवर कठोर कारवाईसह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री यांना निवेदन.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
September 1, 2026
in solapur`
0
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सोलापूरात मूक मोर्चाशि;वरे घटनेतील दोषींवर कठोर कारवाईसह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री यांना निवेदन.
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी -सोलापूर 

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन, जिल्हा शाखा सोलापूरच्या वतीने मंगळवारी (दि. १ सप्टेंबर) जिल्हा परिषद कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळावे तसेच विविध प्रलंबित न्याय्य मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/09/VID-20260901-WA0108.mp4

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे १७ ऑगस्ट रोजी ग्रामसभा सुरू असताना कर्तव्य बजावत असलेल्या ग्रामपंचायत अधिकारी स्व. श्री. पी. एन. पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याचे युनियनने निवेदनात नमूद केले आहे.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/09/VID-20260901-WA0099.mp4
https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/09/VID-20260901-WA0105.mp4

या पार्श्वभूमीवर युनियनच्या वतीने मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. शिवरे घटनेतील दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करून तातडीने अटक करावी आणि प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/09/VID-20260901-WA0093.mp4

तसेच वर्षभरात वारंवार होणाऱ्या ग्रामसभांची संख्या मर्यादित करून वर्षातून एकच आर्थिक नियोजन व आढावा ग्रामसभा घेण्याची कायदेशीर तरतूद करावी, ग्रामसभेतील अनधिकृत व्हिडिओ चित्रीकरण व सोशल मीडिया माध्यमातून होणाऱ्या बदनामीवर प्रतिबंध घालावा, संवेदनशील व वादग्रस्त ग्रामपंचायतींच्या बैठकींसाठी विनामूल्य पोलीस संरक्षण द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/09/VID-20260901-WA0080.mp4

कृषी, आरोग्य, समाजकल्याण आदी विभागांच्या योजनांसाठी आयोजित विशेष ग्रामसभांची प्रशासकीय व आयोजनाची जबाबदारी संबंधित विभागांकडे सोपवावी. तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांतील लाभार्थी निवड ग्रामसभेत करण्याऐवजी तालुका किंवा पंचायत समिती स्तरावर संबंधित विभागामार्फत पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या भावना, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि कामकाजातील अडचणी शासनाने गांभीर्याने विचारात घेऊन मागण्यांवर तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा युनियनने व्यक्त केली.

मोर्चाचे नेतृत्व युनियनचे अध्यक्ष शरद भुजबळ, सरचिटणीस दयानंद पाटील, कार्याध्यक्ष नारायण ढवळे, मानद अध्यक्ष सुशेन ननवरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष (महिला) सुनंदा भिमराव बडेकर, कोषाध्यक्ष विठ्ठल आ. लिगाडे, सहसचिव किसन ब. माळी, संघटक प्रदीप भा. काळे, महिला संघटक योगिता, प्रसिद्धी प्रमुख शरद जगदाळे, कायदेशीर सल्लागार पांडुरंग एकतपुरे यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

जनता संघर्ष न्यूज,सोलापूर 

संपादक – सिद्धार्थ भडकुंबे 

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240

Previous Post

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य- ५ आदर्श शाळांची निर्मिती; NQAS प्रमाणित आरोग्य केंद्रांची संख्या १०० करण्याचे उद्दिष्ट- मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन.

Next Post

आम आदमी पार्टीच्या सोलापूर शहर महिला आघाडी अध्यक्षपदी मोनिका सरकार पवार.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
आम आदमी पार्टीच्या सोलापूर शहर महिला आघाडी अध्यक्षपदी मोनिका सरकार पवार.

आम आदमी पार्टीच्या सोलापूर शहर महिला आघाडी अध्यक्षपदी मोनिका सरकार पवार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“साहेबांनी शब्द दिला… आणि तो पूर्ण केला! १४ हजारांहून अधिक शिलाई मशीनचे वाटप.”शब्दांकन – श्री. राजकुमार हिवरकर पाटील, जिल्हाप्रमुख (शिवसेना शिंदे गट)

“साहेबांनी शब्द दिला… आणि तो पूर्ण केला! १४ हजारांहून अधिक शिलाई मशीनचे वाटप.”शब्दांकन – श्री. राजकुमार हिवरकर पाटील, जिल्हाप्रमुख (शिवसेना शिंदे गट)

by Janta Sangharsh News
October 7, 2026
0

प्रतिनिधी – सोलापूर “एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश झाला की काम थांबत नाय… ते थेट पूर्ण होतं!” या भूमिकेतून महिलांच्या स्वावलंबनाला...

कारंब्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान; मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर

कारंब्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान; मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर

by Janta Sangharsh News
October 6, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत कारंबा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले...

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

Load More

वेबसाईट दर्शक

0022910

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697