प्रतिनिधी – सोलापूर
आम आदमी पार्टीच्या सोलापूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मोनिका सरकार पवार यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. पक्ष संघटनेचा विस्तार आणि महिला शक्तीला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आम आदमी पार्टीकडून महाराष्ट्रासह सोलापूर शहरात संघटनात्मक बांधणी आणि पक्षविस्ताराचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महिला आघाडी अधिक सक्षम करण्यासोबतच महिलांना पक्षाच्या माध्यमातून सामाजिक आणि संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घेता यावा, या उद्देशाने मोनिका सरकार पवार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

मोनिका पवार यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे प्रभारी प्रकाशची जरवाल, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित पाटील, प्रदेश सचिव डॉ. अभिजीत मोरे, प्रदेश संघटक सागर पाटील तसेच सोलापूर शहराध्यक्ष निलेश संगेपान यांनी त्यांचे अभिनंदन केले.
शहरातील महिलांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे, महिलांना संघटित करणे तसेच आम आदमी पार्टीची ध्येयधोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोनिका पवार सक्रियपणे कार्य करतील, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या निवडीमुळे सोलापूर शहरातील आम आदमी पार्टीच्या महिला आघाडीच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, मोनिका सरकार पवार यांच्या निवडीबद्दल शहरातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240

















