
प्रतिनिधी – दक्षिण सोलापूर
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे गट विकास अधिकारी मनोज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कार्यशाळेचे आयोजन तसेच माहिती अधिकार विषयावर प्रश्नमंजुषा घेण्यात आली.

यावेळी प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे यांनी माहितीच्या अधिकाराचे महत्त्व स्पष्ट केले. प्रशासनात पारदर्शकता आणणे, शासकीय कामकाज जनतेसाठी खुले करणे आणि नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास वाढविणे हा माहितीच्या अधिकार कायद्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

माहिती अधिकार कायद्यानुसार अर्जदाराने मागितलेली माहिती नियमानुसार ३० दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे. माहितीचा अधिकार हा नागरिकांचा कायदेशीर अधिकार असून, अर्जदारांना सहकार्याची भूमिका ठेवणे गरजेचे आहे, असे गोडसे यांनी नमूद केले. तसेच कार्यालयातील कामकाजाचे स्वरूप, नियम, कर्मचाऱ्यांचे अधिकार, विविध शासकीय योजनांची माहिती संकेतस्थळावर किंवा सूचना फलकावर अद्ययावत ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी आयोजित प्रश्नमंजुषेत मनीषा वास्ते, गिरीषचंद्र वाघमारे, ज्योतीराम भोसले, सदाशिव कोळी, सुरेश राठोड, समीर शेख, मृणालिनी शिंदे, संदीप घोडके, शहानवाज शेख, बसवराज बिराजदार, रुपाली मोरे, स्नेहा जाधव, अंजली पाटील, आरती मैंदळकर, सुरेखा तोंडसे, मिलन बिराजदार, श्रीकांत माने, चंद्रकांत जगताप, अजीज सय्यद, महेश गायकवाड, मनोहर राठोड, दिपाली देंडे आणि प्रज्वल कुर्ले यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमादरम्यान माहिती अधिकार कायद्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

















