
सोलापूर | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य लेखा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद दादा कांबळे यांच्या आवाहनानुसार चंद्रपूर जिल्हा परिषदेचे CAFO अतुल गायकवाड यांच्या कथित वादग्रस्त कार्यशैलीच्या निषेधार्थ सोलापूर जिल्हा परिषदेतील सर्व लेखा कर्मचाऱ्यांनी सोमवारी काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले.

महाराष्ट्र राज्य लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने आज राज्यातील सर्व ३४ जिल्हा परिषदांमध्ये काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध नोंदविण्यात येत आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील सुमारे ३५०० लेखा कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य कर्मचारी युनियन सोलापूर, महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघ शाखा सोलापूर, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना सोलापूर, जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना सोलापूर तसेच जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांनीही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
काळ्या फिती लावून कामकाज करत लेखा कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

















