
प्रतिनिधी – सोलापूर
सोलापूर : साईनगर, जुळे सोलापूर परिसरात यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तीमय वातावरणात आणि सामाजिक एकोप्याच्या भावनेतून साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाचे यंदाचे हे तिसरे वर्ष असून, परिसरातील नागरिकांनी जाती-धर्म-पंथाचे भेद बाजूला ठेवत मोठ्या आनंदाने आणि एकोप्याने उत्सवात सहभाग घेतला.

गणेशोत्सवानिमित्त परिसरात विविध धार्मिक तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः लहान मुलांसाठी लिंबू-चमचा, संगीत खुर्ची, नृत्य आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. महिलांसाठीही विविध मनोरंजनात्मक खेळ व स्पर्धा घेण्यात आल्या. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकी, परस्पर स्नेह आणि एकतेची भावना अधिक दृढ होत असल्याचे यावेळी दिसून आले. उत्सवातील विविध कार्यक्रमांमध्ये महिला, पुरुष तसेच लहान मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला.
यावेळी विनोद जाधव, धनराज मस्के, गणेश सोनवणे, महेश मदभावी, मशाक मुजावर, कुणाल शिंदे, नगरसेवक दीपक जमादार, महेश सोनवणे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप देत यंदाचा गणेशोत्सव उत्साहात संपन्न झाला.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

















