Monday, November 23, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

सद्दाम आमलीचुंगे खून प्रकरणातील एकूण १५ आरोपी अटकेत – गुन्ह्यात वापरलेली वाहने व लोखंडी हत्यारे जप्त.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
October 22, 2026
in solapur`, Crime
0
सद्दाम आमलीचुंगे खून प्रकरणातील एकूण १५ आरोपी अटकेत – गुन्ह्यात वापरलेली वाहने व लोखंडी हत्यारे जप्त.
0
SHARES
222
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी – वळसंग

वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील वळसंग गावात दिनांक 09/09/2026 रोजी दोन गटांत वाद होऊन सद्दाम आमलीचुंगे यांना जबर मारहाण झाली होती. सदर मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असताना दिनांक 11/09/2026 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी वळसंग पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 556/2026, भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 109(1), 118(1)(2), 115(2), 189(2), 190, 191(2)(3), 351(2)(3), 352, 324(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी यासीन अब्बास कटरे, मोहसीन वजीर तांबोळी, बुडन कटरे यांच्यासह एकूण 15 आरोपींना वळसंग पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.तपासादरम्यान आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली एक इनोव्हा कार, एक महिंद्रा स्कॉर्पिओ, एक रिक्षा, तसेच लोखंडी रॉड, लोखंडी पाईप व इतर हत्यारे आरोपींकडून जप्त करण्यात आली आहेत.

सदर गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यासाठी वळसंग पोलीस ठाण्याची तीन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट श्री. राजेंद्र टाकणे व सहायक पोलीस निरीक्षक श्री. राहुल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे हे करीत आहेत.

सदर कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक कोळी, पोलीस हवालदार देवकर, मालचे, मियाँवाले तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद मांढरे व गजानन गायकवाड यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

जनसंपर्क अधिकारी
पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रामीण


जनता संघर्ष न्यूज, सोलापूर 

संपादक – सिद्धार्थ भडकुंबे 

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

Previous Post

मैंदर्गीतील मुख्याध्यापकाच्या गैरहजेरीचे प्रकरण ऐरणीवर! दोन महिन्यांनंतर पुन्हा नियुक्ती; गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Next Post

बोगस मतदार आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार! – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
बोगस मतदार आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार! – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन.

बोगस मतदार आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार! – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूरच्या रश्मी बोराडे यांचे AIWAA 2026 मध्ये ‘Outstanding Educator’ पुरस्कारासाठी नामांकन.

सोलापूरच्या रश्मी बोराडे यांचे AIWAA 2026 मध्ये ‘Outstanding Educator’ पुरस्कारासाठी नामांकन.

by Janta Sangharsh News
November 23, 2026
0

शैक्षणिक क्षेत्रातील सात वर्षांच्या उल्लेखनीय योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल.  प्रतिनिधी - सोलापूर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी...

अक्कलकोटमध्ये टिपू सुलतान जयंती उत्साहात साजरी; गरीब विद्यार्थ्यांना शालेय बॅग व मिठाई वाटप.

अक्कलकोटमध्ये टिपू सुलतान जयंती उत्साहात साजरी; गरीब विद्यार्थ्यांना शालेय बॅग व मिठाई वाटप.

by Janta Sangharsh News
November 23, 2026
0

प्रतिनिधी - अक्कलकोट शेर-ए-हिंद टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त अक्कलकोट शहरात अभिवादन कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. टी.एस.एस. फाउंडेशनच्या वतीने विजय...

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी नेत्ररोग, मोतीबिंदू तपासणी व...

पत्रकार सुरक्षा समितीचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. राम हुंडारे यांना जाहीर

पत्रकार सुरक्षा समितीचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. राम हुंडारे यांना जाहीर

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल. प्रतिनिधी - सोलापूर पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी राज्यभर लढा...

डफरीन चौक आयटीआयच्या आलिशा शेखची अखिल भारतीय परीक्षेत ९६ टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांकाची झेप!

डफरीन चौक आयटीआयच्या आलिशा शेखची अखिल भारतीय परीक्षेत ९६ टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांकाची झेप!

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  डफरीन चौक येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), सोलापूर येथील प्रशिक्षणार्थी आलिशा शेख हिने अखिल भारतीय व्यवसाय...

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

पंढरीच्या पावन भूमीत प्रशासनाच्या कार्याचा गौरव; लाखो वारकऱ्यांच्या सेवेला मिळाली कौतुकाची थाप!  प्रतिनिधी - पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पावन नगरीत कार्तिकी...

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा...

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

by Janta Sangharsh News
November 17, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील बोगस जातीचे दाखले तपासून ते रद्द करण्यात यावेत, तसेच पुणे...

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

by Janta Sangharsh News
November 16, 2026
0

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची सूचना; टंचाई निवारण, जलसंधारण व घरकुल योजनांचाही घेतला आढावा. प्रतिनिधी - सांगोला  पंचायत समिती...

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

औज मंद्रूप येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न; ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प! प्रतिनिधी -:औज मंद्रूप (ता. दक्षिण...

Load More

वेबसाईट दर्शक

0046472

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697