Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद सोलापूरच्या निबंध स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
July 22, 2026
in Eductional, solapur`
0
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद सोलापूरच्या निबंध स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

३,६५५ शाळांतील १ लाख २२ हजार १६७ विद्यार्थ्यांचा सहभाग; पर्यावरण, सामाजिक जाणीव आणि विकसित भारताची स्वप्ने लेखणीतून व्यक्त.

प्रतिनिधी -सोलापूर, दि. २३ जुलै,२०२६

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद सोलापूरच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित तालुकास्तरीय निबंध लेखन स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्य, वैचारिक क्षमता, सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्रप्रेमाची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत जिल्ह्यातील ३,६५५ शाळांमधील तब्बल १ लाख २२ हजार १६७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.ही स्पर्धा शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या नियोजनातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

स्पर्धा इयत्ता तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गटनिहाय घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी मानवी जीवनातील वृक्षांचे महत्त्व, माझे गाव–सुंदर गाव, सर्व जगाचा अन्नदाता–शेतकरी राजा, पाणी हेच जीवन, वृक्ष संवर्धन ही काळाची गरज, आषाढी वारी आणि शाश्वत विकासासाठी युवकांची भूमिका या विषयांवर अभ्यासपूर्ण, वैचारिक आणि प्रभावी निबंध सादर करत आपल्या लेखन कौशल्याचा उत्कृष्ट आविष्कार घडविला.तालुकानिहाय अंतिम अहवालानुसार माळशिरस तालुक्यात सर्वाधिक ४७६ शाळांचा, तर सांगोला तालुक्यात ४७१ शाळांचा सहभाग नोंदविण्यात आला. विद्यार्थी सहभागामध्ये अक्कलकोट तालुका १६,८१९ विद्यार्थ्यांसह प्रथम, सांगोला १५,१७७ विद्यार्थ्यांसह द्वितीय आणि माढा १५,४०० विद्यार्थ्यांसह तृतीय क्रमांकावर राहिला.

तालुकानिहाय सहभाग पुढीलप्रमाणे आहे : बार्शी – ३६० शाळा (१०,५४२ विद्यार्थी), मंगळवेढा – २७० (१०,२४३), मोहोळ – २९३ (९,४६०), माढा – ३५१ (१५,४००), उत्तर सोलापूर – १२८ (५,७८८), पंढरपूर – ४१३ (९,५३७), करमाळा – २७६ (७,२५६), अक्कलकोट – ३३२ (१६,८१९), सांगोला – ४७१ (१५,१७७), माळशिरस – ४७६ (१३,४६९) आणि दक्षिण सोलापूर – २८५ शाळा (८,४७६ विद्यार्थी).

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना आणि विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच या उपक्रमाची खरी पावती आहे,” असे शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार यांनी सांगितले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. जिल्हाभरातून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे जिल्हा परिषद सोलापूरच्या शिक्षण विभागाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारा आणि लेखन संस्कृतीला बळकटी देणारा ठरल्याची भावना प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी व्यक्त केली.

Previous Post

बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात ऑल इंडिया पँथर सेनेचा एल्गार; दोषी अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी बेमुदत उपोषण.

Next Post

पत्रकार कृती समिती व अप्पाश्री मित्र परिवाराकडून भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
पत्रकार कृती समिती व अप्पाश्री मित्र परिवाराकडून भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.

पत्रकार कृती समिती व अप्पाश्री मित्र परिवाराकडून भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022694

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697