
प्रतिनिधी -सोलापूर, दि. २२ जुलै २०२६
पत्रकार कृती समिती व अप्पाश्री मित्र परिवाराच्या वतीने जिल्हा परिषद येथील बागेत दुपारी १.३० वाजता पत्रकार कृती समितीचे सदस्य अस्लम नदाफ, प्रेस मीडिया न्यूजचे संपादक प्रवीण पारवे तसेच आरटीआय कार्यकर्ते बापू ताज पटेल यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी सत्कारमूर्तींचा शाल, टोपी व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव उपस्थित मान्यवरांनी केला. तसेच त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.


हा सत्कार सोहळा तिसरी आंख मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष मा. अप्पासाहेब लंगोटे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला.हा सत्कार सोहळा तिसरी आंख मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष मा. अप्पासाहेब लंगोटे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास मा. अप्पासाहेब लंगोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नितीन करजोळे, लतीफ नदाफ, मिलिंद प्रक्षाळे, सिद्धाराम नंदरगी, गिरमल्ला गुरव, अक्षय बबलाद, डॉ. राम हुंडारे, सिद्धार्थ भंडकुबे, रविंद्र जाधव, सिद्धू पुजारी, सुरज रजपूत, जहिर नदाफ, फिरोज पटेल, मंथन लकडे, महिबूब सोमजाळ, कुणाल भिसे यांच्यासह अनेक पत्रकार, आरटीआय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच अप्पाश्री मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्तींच्या जनहिताच्या कार्याचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.















