Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

जनता संघर्ष न्यूज आयोजित दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार व समाजोपयोगी संस्था-संघटनांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
July 24, 2026
in solapur`
0
जनता संघर्ष न्यूज आयोजित दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार व समाजोपयोगी संस्था-संघटनांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न.
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी -सोलापूर 

जनता संघर्ष न्यूज आयोजित “इयत्ता दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार व समाजोपयोगी संस्था-संघटनांचा सन्मान सोहळा-२०२६” हा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. शिक्षण, समाजसेवा व मानवतेचा गौरव करणाऱ्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.या सोहळ्यात पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, प्राचार्य डॉ. नसीम पठाण, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे तसेच गिरजा महिला सहकारी संस्थेच्या अध्यक्षा सौ. शुभांगी दर्गोपाटील यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थी, समाजोपयोगी संस्था-संघटना व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षरीची प्रतिकृती असलेले विशेष पेन देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर सिद्धार्थ भडकुंबे व लक्ष्मी नागणसुरे यांनी स्वागतगीत सादर करून वातावरण भारावून टाकले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले.उत्कृष्ट सूत्रसंचालिका व निवेदिका नर्मदा कनकी यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर श्रीकांत हाले यांनी आभार प्रदर्शन केले. उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचा शाल, फेटा, गुलाबपुष्प आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षरीचे विशेष पेन देऊन सन्मान करण्यात आला.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/07/VID-20260724-WA0009.mp4

यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून जनता संघर्ष न्यूजच्या या समाजाभिमुख उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. शिक्षणाला प्रोत्साहन देतानाच समाजसेवकांचा सन्मान करणारा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगत सिद्धार्थ भडकुंबे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/07/VID-20260724-WA0010.mp4

सन्मानित संस्था व मान्यवर

रॉबिन हूड आर्मी, अक्कलकोट-संस्थापक रशीद किस्तके

प्रयास फाउंडेशन, सोलापूर- अध्यक्ष साजन हावळे

क्रांतिवीर भगतसिंग युवा प्रतिष्ठान -अध्यक्ष दशरथ काळे

संस्कार संजीवनी फाउंडेशन, आश्रम हगलूर -परमेश्वर काळे

रणसम्राट बहुउद्देशीय सामाजिक संस्था, विजापूर रोड- मिलिंद ठोंबरे

एम.जे. प्रथम मानव सेवा संस्था- मोहन तालाकोल्लूल

एम. के. फाउंडेशन, सोलापूर -संस्थापक महादेव कोगुरे

सुचंद्र मागासवर्गीय चॅरिटेबल ट्रस्ट, सोलापूर – संस्थापक शीलरत्न चंद्रकांत गायकवाड

संजीवनी महिला मंडळ, सोलापूर -संस्थापक संजीवनी गायकवाड-पंडागळे

बी.एस. फाउंडेशन, सोलापूर – संस्थापक अन्सर तांबोळी (बी.एस. शेट)

मैत्री सोशल फाउंडेशन, सोलापूर – विनायक साळुंके

गुणवंत विद्यार्थी व विशेष सन्मान-

या प्रसंगी आनन्या कुलकर्णी, स्वरा पाटील, प्रणव धुमाळ, प्रज्ञा प्रसन्न, वैभवी हिरेमठ, सौरभ बनसोडे, प्रणया साळुंखे, सर्वेश एकबोटे, वैष्णवी बाडकर, अनुष्का ऐवाळे आणि असावरी खारे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.याशिवाय किरण बंडगर यांची पॉलिटेक्निक कॉलेज, सोलापूर कॅम्पस निवड झाल्याबद्दल, पूजा हर्डीकर यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल तसेच सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अशोक सोनकंटले यांचा विशेष सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे, सारा न्यूजचे संपादक डॉ. राम हुंडारे, पत्रकार निलेश डांगे, अमोल कुलकर्णी, नागेश पासकंटी, विजयकुमार जुंजा, गिरमल्ला गुरव, संतोष धोत्रे, सिताराम गायकवाड तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.याच कार्यक्रमात जनता संघर्ष न्यूज चॅनलच्या दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधीपदी द्रौपदी हाले व स्नेहल बशेट्टी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गायत्री हाले, श्रीकांत हाले, द्रौपदी हाले, स्नेहल बशेट्टी, प्रतीक चिंदरकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहार व चहापानाची व्यवस्था करण्यात आली.

शिक्षण, समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या जनता संघर्ष न्यूजच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, हा कार्यक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Previous Post

पत्रकार कृती समिती व अप्पाश्री मित्र परिवाराकडून भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.

Next Post

महाराष्ट्र शासन | ग्राम विकास व पंचायत राज विभाग ग्रामविकासाची वारी… पंढरीच्या दारी!

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
महाराष्ट्र शासन | ग्राम विकास व पंचायत राज विभाग ग्रामविकासाची वारी… पंढरीच्या दारी!

महाराष्ट्र शासन | ग्राम विकास व पंचायत राज विभाग ग्रामविकासाची वारी... पंढरीच्या दारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022699

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697