प्रतिनिधी – सोलापूर
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त फकीरा दलाचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा पारखे यांनी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

या निमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, प्रभात फेरी, वृक्षारोपण तसेच विविध सामाजिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत समाजात शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचविण्याचा या उपक्रमांचा उद्देश असल्याचे पारखे यांनी सांगितले.
या सर्व उपक्रमांमध्ये समाजातील नागरिक, युवक, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन फकीरा दलाचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा पारखे यांनी केले आहे.
















