Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 1, 2026
in solapur`
0
जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन.
0
SHARES
58
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी -सोलापूर

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) वेळापूर आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवत्ता कक्ष (DQC) बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीस प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख,तसेच DIET चे प्राचार्य डॉ. इब्राहिम नदाफ, उपशिक्षणाधिकारी रुपाली भावसार, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सुरेश वाघमारे, ज्येष्ठ अधिव्याख्याता अरुण पाटील, शोभा मिसाळ, अधिव्याख्याता डॉ. प्रभाकर बुधाराम, डॉ.गजेंद्र जमादार जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. विशेषतः Performance Grading Index for District (PGI-D) या निर्देशांकाच्या आधारे सोलापूर जिल्ह्याच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले. विविध घटकांमध्ये जिल्ह्याची सद्यस्थिती, इतर आघाडीच्या जिल्ह्यांशी तुलना, उणिवा, सुधारणा आवश्यक असलेली क्षेत्रे आणि आगामी कालावधीसाठी कृती आराखडा यावर सखोल चर्चा करण्यात आली. जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी प्रत्येक स्तरावरील अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये सातत्याने वाढ होण्यासाठी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN), गुणवत्तापूर्ण अध्यापन, डिजिटल शिक्षण, शाळा सुरक्षा, विद्यार्थी उपस्थिती, शैक्षणिक पर्यवेक्षण आणि माहितीची अचूक नोंद यावर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक शाळेने गुणवत्ता सुधारणा कृती आराखडा प्रभावीपणे राबवून विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख आणि प्राचार्य डॉ. इब्राहिम नदाफ यांनी PGI-D मधील विविध निकषांचे सविस्तर सादरीकरण करून जिल्ह्याची शैक्षणिक कामगिरी अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. UDISE+, PARAKH, PRABANDH या विविध स्रोतांमधील माहिती अचूक व वेळेत भरली जाणे, डेटा पडताळणी, शाळास्तरावर नियमित शैक्षणिक पर्यवेक्षण, उपचारात्मक अध्यापन, सतत सर्वंकष मूल्यमापन, ICT साधनांचा प्रभावी वापर आणि शाळा विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष आढावा घेण्यात आला.

बैठकीत पीएम श्री शाळा, निपुण महाराष्ट्र अभियान, डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम, शिक्षकांचे ५० तासांचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास (CPD) प्रशिक्षण, आयडॉल शिक्षक उपक्रम, डिजिटल शिक्षण, अध्ययन निष्पत्ती, शाळा सुरक्षा, समुदाय सहभाग, शाळांची गुणवत्ता तपासणी तसेच तालुकास्तरीय गुणवत्ता कक्ष बैठकीच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित सर्व अधिकाऱ्यांना ठोस कृती आराखड्यानुसार काम करून जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी प्रत्येक तालुक्यात दरमहा गुणवत्ता कक्ष बैठकीचे नियमित आयोजन करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच प्रत्येक शाळेपर्यंत शासनाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी पोहोचवून विद्यार्थ्यांना दर्जेदार, समावेशक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे असे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले.

Previous Post

Gen G India Entrepreneurship Summit मध्ये शिखर पहारिया फाउंडेशनचा सामाजिक कार्यासाठी सन्मान.

Next Post

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022729

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697