Wednesday, October 7, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

जनतेची सेवा आणि स्वामींची भक्ती हेच माझ्या जीवनाचे मुख्य ध्येय – नगरसेविका रत्नमाला सातव

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 3, 2026
in Akkalkot
0
जनतेची सेवा आणि स्वामींची भक्ती हेच माझ्या जीवनाचे मुख्य ध्येय – नगरसेविका रत्नमाला सातव
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देवस्थान कार्यालयात नगरसेविका रत्नमाला संदीप सातव यांचा सत्कार करताना श्रीशैल गवंडी व अन्य.

प्रतिनिधी -सोलापूर 

श्री वटवृक्ष स्वामींच्या दरबारात आल्यावर मनाला अपार शांती मिळते. स्वामी भक्तांना दर्शन घडवणे हीच माझ्यासाठी खरी सेवा आहे. गतवर्षी श्री दत्त जयंती कालावधीत पुण्यातील ५००० भक्तांना अक्कलकोटची वारी घडवली होती, त्याचे पुण्य व फळ स्वामींनी नगरसेविका पदाच्या माध्यमातून दिले आहे. नुसते फळच दिले असे नाही तर त्याच कालावधीत पार पडलेल्या पुण्यातील नगरसेवक पदाच्या निवडणूकीत सर्वात जास्त मतांनी निवडून येण्याचा अभिमान बाळगण्याची संधी श्री स्वामी समर्थांनी दिली आहे, म्हणून जनतेची सेवा आणि स्वामींची भक्ती हेच
माझ्या जीवनाचे मुख्य ध्येय असल्याचे मनोगत पुणे शहरातील विक्रमी मतांनी निवडून आलेल्या नगरसेविका रत्नमाला संदीप सातव यांनी व्यक्त केले.
आज नगरसेविका रत्नमाला संदीप सातव यांनी कुटुंबासह श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देवून श्री स्वामीं समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीशैल गवंडी यांनी नगरसेविका रत्नमाला संदीप सातव यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद आणि स्वामींची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी नगरसेविका रत्नमाला संदीप सातव बोलत होत्या.
पुढे बोलताना नगरसेविका रत्नमाला सातव म्हणाल्या की आम्ही अक्कलकोट तालुक्यातील गोगावच्या सरपंच वनिता मधुकर सुरवसे आमच्या स्नेही आहेत तसेच सातव कुंटूंबीय निस्सीम स्वामीभक्त आणि लोकसेवक आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून भक्तसेवा आणि जनसेवेचे कार्य करत आहोत. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपणास तब्बल २३,१३६ मतांनी मिळालेल्या विक्रमी मतांचा विजयी निकाल या कार्याचा आणि स्वामी कृपेचा पुरावा आहे. यापुढेही स्वामींचा आशीर्वाद असाच राहो आणि माझ्या कडून अधिकाधिक जनसेवा घडो हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी आपली प्रार्थना आहे. येथील वटवृक्ष मंदीरातील आदरतिथ्य व स्वामींची कृपा हे जीवनातील शास्वत सत्य आहे. येथे करण्यात आलेल्या आदरतिथ्याबद्दल आपण मंदिर समितीचे चेअरमन महेश मालक इंगळे यांचे ऋणी आहोत, तसेच मंदिर समितीचे व आमचे मित्र श्रीशैल गवंडी यांचेही नेहमीच आम्हाला सहकार्य असते त्यांचेही आम्ही मनापासून ऋणी आहोत असेही मनोगत व्यक्त केले. यावेळी देवस्थान व्यवस्थापनाने त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यावेळी मंदीर समितीचे विश्वस्त महेश गोगी, प्रसाद सोनार, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, रूद्रय्या स्वामी आदींसह स्वामी भक्त व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त ‘लोक सम्राट’ न्यूज पोर्टलचे अनावरण.

Next Post

श्री नीलकंठेश्वर सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी आनंद रेब्बा तर प्रेसिडेंटपदी सुनील धुळम यांची निवड.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
श्री नीलकंठेश्वर सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी आनंद रेब्बा तर प्रेसिडेंटपदी सुनील धुळम यांची निवड.

श्री नीलकंठेश्वर सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी आनंद रेब्बा तर प्रेसिडेंटपदी सुनील धुळम यांची निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“साहेबांनी शब्द दिला… आणि तो पूर्ण केला! १४ हजारांहून अधिक शिलाई मशीनचे वाटप.”शब्दांकन – श्री. राजकुमार हिवरकर पाटील, जिल्हाप्रमुख (शिवसेना शिंदे गट)

“साहेबांनी शब्द दिला… आणि तो पूर्ण केला! १४ हजारांहून अधिक शिलाई मशीनचे वाटप.”शब्दांकन – श्री. राजकुमार हिवरकर पाटील, जिल्हाप्रमुख (शिवसेना शिंदे गट)

by Janta Sangharsh News
October 7, 2026
0

प्रतिनिधी – सोलापूर “एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश झाला की काम थांबत नाय… ते थेट पूर्ण होतं!” या भूमिकेतून महिलांच्या स्वावलंबनाला...

कारंब्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान; मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर

कारंब्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान; मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर

by Janta Sangharsh News
October 6, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत कारंबा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले...

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

Load More

वेबसाईट दर्शक

0022908

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697