Wednesday, October 7, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

आकांक्षित तालुक्यांतील ३८ उद्दिष्टे वेळेत पूर्ण करा- सीईओ कुशल जैन;नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमाची जिल्हास्तरीय समन्वय व आढावा बैठक संपन्न.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 7, 2026
in solapur`
0
आकांक्षित तालुक्यांतील ३८ उद्दिष्टे वेळेत पूर्ण करा- सीईओ कुशल जैन;नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमाची जिल्हास्तरीय समन्वय व आढावा बैठक संपन्न.
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी -सोलापूर 

आकांक्षित तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चित करण्यात आलेली ३८ उद्दिष्टे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या.जिल्हा परिषदेमार्फत नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय व आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत तालुकानिहाय विविध विकास निर्देशांकांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, अक्कलकोटचे गटविकास अधिकारी शंकर कवितके, करमाळ्याचे गटविकास अधिकारी अमित कदम, सांगोल्याचे सहायक गटविकास अधिकारी वसंत फुले, तसेच जिल्हास्तरीय विविध विभागांचे प्रमुख, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, ग्रामविकास विभागाचे अधिकारी आणि तालुका फेलो कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सीईओ कुशल जैन यांनी आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी व पर्यावरण, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या क्षेत्रांतील निर्देशांकांचा सखोल आढावा घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या. शासनाने निश्चित केलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रलंबित बाबी तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.देशातील सर्वाधिक मागासलेल्या ५१३ तालुक्यांच्या तसेच महाराष्ट्रातील २७ तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाने आकांक्षित तालुका कार्यक्रम सुरू केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा आणि सांगोला या तीन तालुक्यांचा या कार्यक्रमात समावेश आहे.

नीती आयोगाच्या राज्यस्तरीय रँकिंगमध्ये अक्कलकोट तालुक्याने तिसरे स्थान मिळविले असून सांगोला तालुका सातत्याने प्रगतीपथावर असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. कार्यक्रमांतर्गत आरोग्य, महिला व बालकल्याण, शिक्षण, कृषी, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासाशी संबंधित ३८ निर्देशांकांच्या आधारे नियमित आढावा घेतला जात आहे.

बैठकीच्या शेवटी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखत आकांक्षित तालुका कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून शासनाची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

नीती आयोगाच्या रँकिंगमध्ये अक्कलकोट राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

केंद्र शासनाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा आणि सांगोला या तीन तालुक्यांचा समावेश आहे. राज्यातील नीती आयोगाच्या रँकिंगमध्ये अक्कलकोट तालुका तिसऱ्या क्रमांकावर असून सांगोला तालुका सातत्याने प्रगतीपथावर आहे. या यशामुळे जिल्ह्याच्या विकासकामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post

अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी २४ तासांत चोराच्या मुसक्या आवळल्या; ज्येष्ठ महिलेचे दागिने व रोख रक्कम परत मिळवण्यात यश.

Next Post

उपसभापती सागर दादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त वागदरी येथे शालेय साहित्य व खाऊ वाटप.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
उपसभापती सागर दादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त वागदरी येथे शालेय साहित्य व खाऊ वाटप.

उपसभापती सागर दादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त वागदरी येथे शालेय साहित्य व खाऊ वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कारंब्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान; मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर

कारंब्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान; मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर

by Janta Sangharsh News
October 6, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत कारंबा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले...

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

Load More

वेबसाईट दर्शक

0022891

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697