
प्रतिनिधी- अक्कलकोट
अक्कलकोट पंचायत समितीचे उपसभापती सागर दादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त वागदरी येथे सामाजिक बांधिलकी जपत शालेय साहित्य व खाऊ वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. युवा नेते शिवराज (मंत्री) पोमाजी व सुनील सावंत यांच्या पुढाकारातून वागदरी येथील कन्नड व मराठी माध्यमाच्या शाळा, उर्दू शाळा तसेच सर्व अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह पाहून हा उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला. यावेळी उपस्थित शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसह उपसभापती सागर दादा कल्याणशेट्टी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.याप्रसंगी गोगावचे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, महादेव सोनकवडे, शाम बाबर आणि सागर वामने यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे ही समाजाची महत्त्वाची जबाबदारी आहे. उपसभापती सागर दादा कल्याणशेट्टी यांनी नेहमीच सर्वसामान्य, गोरगरीब व वंचित घटकांच्या हितासाठी कार्य केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रेरणा देणारा असून, अशा सामाजिक उपक्रमांची परंपरा भविष्यातही कायम राहावी. सागर दादा यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात अधिक यश लाभो, हीच वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.”
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचा आदर्श संदेश समाजापुढे ठेवण्यात आला.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9569838240















