Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी २४ तासांत चोराच्या मुसक्या आवळल्या; ज्येष्ठ महिलेचे दागिने व रोख रक्कम परत मिळवण्यात यश.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 6, 2026
in Akkalkot, Crime
0
अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी २४ तासांत चोराच्या मुसक्या आवळल्या; ज्येष्ठ महिलेचे दागिने व रोख रक्कम परत मिळवण्यात यश.
0
SHARES
69
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी-अक्कलकोट

समर्थ नगर,अक्कलकोट येथील श्रीमती लक्ष्मीबाई रामचंद्र गड्डद (७७) या ज्येष्ठ महिलेच्या पर्समधून चोरीस गेलेली अर्ध्या तोळ्याची बोरमाळ आणि पेन्शनचे ₹१२,६०० अवघ्या २४ तासांत शोधून काढत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने आरोपीला जेरबंद केले. पोलिसांच्या वेगवान, तांत्रिक आणि अचूक तपासामुळे गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक केले आहे.

समर्थ नगर येथील लक्ष्मीबाई रामचंद्र गड्डद (वय ७७) या सकाळी फत्तेसिंह चौकातील गणेश पोतदार यांच्या के.पी. कॉम्प्युटर्स एसबीआय ग्राहक सेवा केंद्रात पेन्शन काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी सकाळी ११.२४ वाजता ₹१२,६०० काढून ते अर्ध्या तोळ्याच्या बोरमाळीसह पर्समध्ये ठेवले. बीपीचा त्रास झाल्याने काही वेळ त्या सेवा केंद्रात बसून राहिल्या आणि नंतर रिक्षाने घरी गेल्या. घरी पोहोचल्यानंतर मुलाला पैसे देण्यासाठी पर्स उघडली असता रोख रक्कम आणि बोरमाळ गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.घाबरलेल्या लक्ष्मीबाईंनी तातडीने ग्राहक सेवा केंद्र गाठून चौकशी केली. प्राथमिक पाहणीत कोणताही ठोस धागा हाती लागला नाही.परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजही अस्पष्ट असल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या. मात्र डी.बी. पथकाने हार न मानता फत्तेसिंह चौकातील आयडीबीआय बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेतला. त्यामधील संशयास्पद हालचालींच्या आधारे पोलिसांनी गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि संशयितांची कसून चौकशी केली. अखेर आरोपीपर्यंत पोहोचत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.

या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात प्रथम खबर क्रमांक ०४३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली दागिना आणि पैसा हस्तगत केला. चोराला अटक करण्यात आली आहे. 

ही उल्लेखनीय कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश पवार यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश अंगुले, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत जवळगे, पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल केदारनाथ सुतार यांनी केली.पोलीस निरीक्षक अविनाश पवार यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीची तातडीने गांभीर्याने दखल घेत अवघ्या एका दिवसात गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीला अटक केल्याने अक्कलकोट उत्तर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.आणी विशेष करुन डी.बी. पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश अंगुले व पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत जवळगे यांनी या तपासाची खरे मानकरी ठरले आहे.त्यानंतर श्रीमती लक्ष्मीबाई गड्डद यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र टाकणे व पोलीस निरीक्षक अविनाश पवार आणी डी.बी. पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश अंगुले, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत जवळगे व उत्तर पोलिस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची कृतज्ञता व्यक्त केले.

Previous Post

बालक निरोगी तर भविष्य सुरक्षित’; कुशल जैन यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य तपासणीला गती.

Next Post

आकांक्षित तालुक्यांतील ३८ उद्दिष्टे वेळेत पूर्ण करा- सीईओ कुशल जैन;नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमाची जिल्हास्तरीय समन्वय व आढावा बैठक संपन्न.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
आकांक्षित तालुक्यांतील ३८ उद्दिष्टे वेळेत पूर्ण करा- सीईओ कुशल जैन;नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमाची जिल्हास्तरीय समन्वय व आढावा बैठक संपन्न.

आकांक्षित तालुक्यांतील ३८ उद्दिष्टे वेळेत पूर्ण करा- सीईओ कुशल जैन;नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमाची जिल्हास्तरीय समन्वय व आढावा बैठक संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022696

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697