Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

बालक निरोगी तर भविष्य सुरक्षित’; कुशल जैन यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य तपासणीला गती.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 6, 2026
in solapur`
0
‘एकही बालक उपचारापासून वंचित नको’; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘एकही बालक उपचारापासून वंचित नको’; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

प्रतिनिधी – सोलापूर 

बालक निरोगी तरच भविष्य सक्षम! या उद्देशाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यावर सोलापूर जिल्हा परिषदेने भर दिला आहे. एकही बालक आरोग्य तपासणी व आवश्यक उपचारांपासून वंचित राहू नये, त्याचे वेळेत निदान होऊन तातडीने उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य आणि शिक्षण विभागाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या.

आरोग्य, शिक्षण व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा तसेच उपचार व शस्त्रक्रियांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी CEO कुशल जैन होते.सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 52 आरोग्य पथके कार्यरत आहेत. या पथकांमार्फत अंगणवाडीतील 0 ते 6 वर्षे आणि शाळांमधील 7 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी केली जाते. तपासणीत आढळणाऱ्या जन्मजात व्यंग, पोषणमूल्यांची कमतरता, शारीरिक व मानसिक विकासातील विलंब तसेच विविध आजारांचे निदान करून आवश्यकतेनुसार उपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करून दिली जाते.जून-जुलै 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, अंगणवाडी स्तरावर जिल्ह्यातील 2 लाख 69 हजार 516 बालकांच्या उद्दिष्टापैकी 1 लाख 99 हजार 644 बालकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे. तर शाळा स्तरावर एप्रिल 2026 पासून आतापर्यंत 72 हजार 77 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे.

हृदयविकाराच्या बालकांना मिळाले नवजीवन

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत गंभीर आजार असलेल्या बालकांना उपचारासाठी संदर्भित करून आवश्यक त्या शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सन 2026-27 मध्ये हृदयशस्त्रक्रियेसाठी ओळख पटलेल्या 39 हृदयशस्त्रक्रिया मुंबई येथे 11 ऑगस्ट ला मोफत करण्यात येणार आहे.

बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, शिक्षणाधिकारी (प्रा.) कादर शेख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. मोहन शेगर, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. श्रीकांत कुलकर्णी, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अधीक्षक मयुर पाटील, आदी उपस्थित होते.

बालकांच्या आरोग्याची तपासणी केवळ कागदावर न राहता, तपासणीत आढळलेल्या प्रत्येक आजाराचे निदान, उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्यावर प्रशासनाचा भर आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी मत व्यक्त केले.

Previous Post

सोलापूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई – बनावट दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश;निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यासह 8 जणांना अटक, सिव्हील मधील 2 वरिष्ठ लिपिकांचाही समावेश.

Next Post

अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी २४ तासांत चोराच्या मुसक्या आवळल्या; ज्येष्ठ महिलेचे दागिने व रोख रक्कम परत मिळवण्यात यश.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी २४ तासांत चोराच्या मुसक्या आवळल्या; ज्येष्ठ महिलेचे दागिने व रोख रक्कम परत मिळवण्यात यश.

अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी २४ तासांत चोराच्या मुसक्या आवळल्या; ज्येष्ठ महिलेचे दागिने व रोख रक्कम परत मिळवण्यात यश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022701

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697