Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

सोलापूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई – बनावट दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश;निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यासह 8 जणांना अटक, सिव्हील मधील 2 वरिष्ठ लिपिकांचाही समावेश.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 5, 2026
in Crime, solapur`
0
सोलापूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई – बनावट दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश;निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यासह 8 जणांना अटक, सिव्हील मधील 2 वरिष्ठ लिपिकांचाही समावेश.
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी – सोलापूर,

सोलापूर शहर गुन्हे शाखेने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या आंतरजिल्हा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी निवासी वैद्यकीय अधिकारी, सिव्हील हॉस्पिटलच्या दोन वरिष्ठ लिपिकांसह एकूण 08 जणांना अटक करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूरचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. ऋत्विक देविदास जयकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बझार पोलीस ठाण्यात गु.र.नं. 554/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4), 336(3), 338, 340(2),233, 235, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी राजेश भाऊसाहेब जाधव, रा. अहिल्यानगर याने कनिष्ठ लिपिक, पाटबंधारे विभाग अहिल्यानगर ही शासकीय नोकरी नियमित करण्यासाठी सोलापूर येथील रहिवासी नसतानाही बनावट आधारकार्ड बनवून दि. 11/05/2026 रोजी UDID ऑनलाईन प्रक्रियेद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले होते.या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी तपास गुन्हे शाखेकडे सोपवला होता.

तांत्रिक तपासातून रॅकेट उघडकीस

तपास अधिकारी यांनी तांत्रिक माहिती प्राप्त करून आरोपी राजेश जाधव याचा शोध घेऊन त्यास गाव- करंदी ता. पारनेर, जि. अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढून देण्याच्या कृत्यात सहभागी असलेल्या सर्व 8 आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

अटक केलेले आरोपी –

1. राजेश भाऊसाहेब जाधव, वय 38, रा. हुडको, नळेगाव, अहिल्यानगर – नोकरी कनिष्ठ लिपिक 2. महेश दिनकर बारगजे, वय 52, रा. अनंततीर्थ कॉलनी, बुरूडगाव रोड, अहिल्यानगर 3. राजेश रमाकांत ढवण, वय 58, सेवानिवृत्त लॅब असिस्टंट, सिव्हील हॉस्पिटल अहिल्यानगर 4. विजय बाबासाहेब गर्जे, वय 48, प्राथमिक शिक्षक, पाथर्डी, अहिल्यानगर 5. अरुण रामदास शिंपी, वय 70, सेवानिवृत्त (बाटा कंपनीत सेल्समन), रा. नाशिक 6. वसीम शौकत खान, वय 42, वरिष्ठ लिपिक, सिव्हील हॉस्पिटल सोलापूर, रा. गजानन नगर, होटगी रोड, सोलापूर 7. सागर गोविंद राजपूत, वय 42, वरिष्ठ लिपिक, सिव्हील हॉस्पिटल सोलापूर, रा. वसंतनगर, विजापूर रोड, सोलापूर 8. सतीश भाऊराव कनके, वय 31, निवासी वैद्यकीय अधिकारी, सध्या जिल्हा महिला व बाल रुग्णालय सोलापूर, मूळ रा. किनवट, जि. नांदेड. 

सिव्हीलमधील 3714 प्रमाणपत्रांची तपासणी

तपासादरम्यान आरोपी क्र. 1 चे बनावट आधारकार्ड कोठे तयार केले याबाबत तपास करून संगणक व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनविण्यासाठी वापरलेले सिव्हील हॉस्पिटल सोलापूर येथील संगणकही जप्त करण्यात आला आहे.धक्कादायक बाब म्हणजे, सिव्हील हॉस्पिटल सोलापूर येथून दि. 01/01/2025 ते 31/06/2026 पर्यंत एकूण 3714 प्रमाणपत्रे दिल्याचे व त्यापैकी 08 प्रमाणपत्रे ही तज्ञांची तपासणी न होताच वितरित झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पुढील तपास चालू आहे.

आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल

आरोपींचे कोर्ट चेकर अॅप व आयसीजेएस प्रणालीवर पूर्व अभिलेख पडताळले असता –

• महेश बारगजे वर अहिल्यानगर मध्ये 420, 471 सह 3 गुन्हे • राजेश ढवण वर कोतवाली ठाण्यात 302, 201 सह गुन्हा • विजय गर्जे वर पाथर्डी ठाण्यात 324, 354, लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. 

या पथकाने केली कारवाई

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेश खेडकर, भरत चंदनशिव व त्यांचे पथक – विनोद रजपुत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा भिंगारे, सुरज पवार, अंकुश मोसले, जावेद जमादार, आबाजी सावळे, विठ्ठल यलमार, धिरज सातपुते, अमोल यादव, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, महेश रोकडे, चालक बाळासाहेब काळे, सतिश काटे तसेच सायबर पो.स्टे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.

Previous Post

दृष्टी नसली तरी जिद्दीला मर्यादा नाही; दिव्यांग विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासाने सर्वांनाच केले अचंबित.

Next Post

बालक निरोगी तर भविष्य सुरक्षित’; कुशल जैन यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य तपासणीला गती.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
‘एकही बालक उपचारापासून वंचित नको’; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

बालक निरोगी तर भविष्य सुरक्षित’; कुशल जैन यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य तपासणीला गती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022696

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697