प्रतिनिधी -सोलापूर
मैंदर्गी येथील संबंधित मठ परिसर तसेच शेतामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळूसाठा करण्यात आल्याचा आरोप करत माजी सरपंच विश्वनाथ इटेनवर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीवर राजकीय दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
https://youtu.be/NE0VZAl_Gwc
तहसीलदारांच्या मूकसंमतीने अवैध वाळूसाठा? चौकशीवर राजकीय दबाव असल्याचा आरोप.
संबंधित मठ व शेतातील वाळूसाठ्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा अचूक मोजणी करण्यात यावी, तसेच वाळू वाहतूक व साठवणुकीसंदर्भातील परवानगी आणि रॉयल्टीची कागदपत्रे काटेकोरपणे तपासण्यात यावीत, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
दोषी आढळणाऱ्यांवर महाराष्ट्र गौण खनिज नियमांनुसार तात्काळ फौजदारी कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच राजकीय दबावाला बळी पडून चुकीचा अथवा दिशाभूल करणारा अहवाल सादर करणाऱ्या संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावरही कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विश्वनाथ इटेनवर यांनी केली आहे.
“वाळूसाठ्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा अचूक मोजणी करून संबंधित कागदपत्रांची कडक तपासणी करावी. दोषींवर कायद्यानुसार कारवाई व्हावी,” अशी भूमिका माजी सरपंच विश्वनाथ इटेनवर यांनी मांडली आहे.















