Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

रूढी-परंपरांना फाटा देत नबी दाजी साबळे यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 13, 2026
in Eductional, solapur`
0
रूढी-परंपरांना फाटा देत नबी दाजी साबळे यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली.
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी -विंचूर, ता. दक्षिण सोलापूर  दि. १३ऑगस्ट २०२६

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवक, भीमशाहीर तथा दलित पँथरचे माजी अध्यक्ष कालकथित नबी (दाजी) साबळे यांच्या जलदान विधीनिमित्त तसेच त्यांच्या पत्नी मातोश्री साळूबाई नबी साबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विंचूर येथे पारंपरिक रूढी-परंपरांना फाटा देत अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहण्यात आली. रक्षा नदीमध्ये विसर्जित न करता सर्व मुली व ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच प्राथमिक शाळा, विंचूर आणि पंचाक्षरी विद्या मंदिर, विंचूर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

नबी दाजी साबळे हे १९८०-८५ या कालखंडात दलित पँथरच्या चळवळीत सक्रिय होते. त्या काळात गावातील सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना मज्जाव करणे, दलितांचे केस न कापणे यांसारख्या अन्यायकारक प्रथांविरोधात त्यांनी ठामपणे आवाज उठविला. त्यांच्या प्रयत्नांतून अनेकांना न्याय मिळाला. या संघर्षाच्या काळात गावात निर्माण झालेला तणावही समाजबांधवांच्या सहकार्याने संयमाने हाताळण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन दाजी यांनी सामाजिक अन्यायाविरोधात सातत्याने संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा बाबासाहेबांचा संदेश त्यांनी समाजातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविला. मुलांनी शिक्षण घेऊन प्रगती करावी, यासाठी ते सातत्याने समाजबांधवांना प्रोत्साहन देत असत. त्यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या कुटुंबावरही राहिला असून त्यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित झाली आहेत.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/08/VID-20260813-WA0039.mp4

१९९०-९२ च्या काळात गावात मोठ्या प्रमाणावर भरविण्यात येणाऱ्या मरिआईच्या यात्रेत रेडे, शेळ्या, बकऱ्या व कोंबड्यांचा बळी देण्याची प्रथा होती. ही अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी दाजी यांनी आपल्या दोन भावांसह पोलिसांत तक्रार करून समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या संघर्षामुळे ही प्रथा बंद करण्यास मोठी मदत झाली.

फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे पक्के पाईक असलेल्या दाजी साबळे यांनी भीमगीतांच्या शाहीरीच्या माध्यमातून गावोगावी बाबासाहेबांचे विचार तळागाळातील समाजापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या सामाजिक व वैचारिक वारशाला अनुसरून त्यांचे पुत्र महादेव नबी साबळे सर व प्रा. विष्णू नबी साबळे यांनी पारंपरिक विधींऐवजी वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.

या कार्यक्रमास राजाभाऊ साबळे, गणेश साबळे, बापू साबळे, शशिकांत साबळे, रविंद्र साबळे, प्रा. संजय साबळे, सह्याद्री साबळे, भारत साबळे, उत्तम साबळे, करण साबळे, यशवंत साबळे, पांडू साबळे, बाबा साबळे, नाना साबळे, महेश साबळे, शंकर साबळे, देविदास साबळे, महेंद्र साबळे सर, सुशिल साबळे सर यांच्यासह ग्रामस्थ व पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नबी साबळे यांचे निधन दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी झाले. त्यांच्या सामाजिक कार्याला आणि विचारांना अभिवादन करण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन, शिक्षण आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्यात आला.

Previous Post

जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार; मैंदर्गी मठात मोठ्या वाळूसाठ्याचा आरोप-माजी सरपंच विश्वनाथ इटेनवरु.

Next Post

संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या बालकलाकार कुमारी जोसेफिया जब्बार मुर्शद हिला राष्ट्रीय गौरव पुरस्कार-२०२६

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या बालकलाकार कुमारी जोसेफिया जब्बार मुर्शद हिला राष्ट्रीय गौरव पुरस्कार-२०२६

संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या बालकलाकार कुमारी जोसेफिया जब्बार मुर्शद हिला राष्ट्रीय गौरव पुरस्कार-२०२६

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022699

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697