
प्रतिनिधी – सोलापूर
संगमेश्वर पब्लिक स्कूलची बालकलाकार कुमारी जोसेफिया जब्बार मुर्शद हिच्या उल्लेखनीय कलागुणांची दखल घेत तिला ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार-२०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जोसेफियाने आपल्या कलाक्षेत्रातील प्रतिभा, सातत्यपूर्ण मेहनत आणि उत्कृष्ट सादरीकरणाच्या माध्यमातून विशेष ठसा उमटवला आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावर तिची निवड करण्यात आली. या पुरस्कारामुळे संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
जोसेफियाच्या या यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक तसेच मित्रपरिवाराने तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही कला आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.















