Friday, October 9, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

देऊळबंद चित्रपट संकल्पनेचे यश सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल : महेश इंगळे

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
July 15, 2026
in solapur`
0
देऊळबंद चित्रपट संकल्पनेचे यश सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल : महेश इंगळे
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देऊळबंद-२’च्या १०० कोटींच्या यशानिमित्त पुण्यात कृतज्ञता सोहळा; आशिष शेलार व प्रवीण तरडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव.

प्रतिनिधी-सोलापूर

अक्कलकोटचे ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ यांच्या प्रचिती संकलनावर आधारित दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळबंद-२’ या भक्तिमय मराठी चित्रपटाने अवघ्या ५० दिवसांत १०० कोटी रुपयांचा व्यवसाय करून मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे. या अभूतपूर्व यशाचे संपूर्ण श्रेय चित्रपटाच्या दमदार संकल्पना व पटकथेला असून ‘देऊळबंद’ चित्रपट संकल्पनेचे यश मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल, असे प्रतिपादन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी केले.देऊळबंद-२’च्या १०० कोटींच्या यशानिमित्त पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्ड रिसॉर्ट येथे आयोजित ‘गोष्ट मोठी १०० कोटी’ या कृतज्ञता सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेते मोहन जोशी, प्रथमेश इंगळे यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रवीण तरडे व मोहन जोशी यांच्या हस्ते मुरलीधर मोहोळ, आशिष शेलार, महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांचा श्री स्वामी समर्थांची मूर्ती, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी महेश इंगळे म्हणाले, “सुरुवातीला ‘देऊळबंद’ ही संकल्पना ऐकून वेगळी वाटली होती. मात्र प्रवीण तरडे यांनी चित्रपटाची कथा समजावून सांगितल्यानंतर त्यामागील विचार स्पष्ट झाला. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने ‘देऊळबंद’च्या दोन्ही चित्रपटांना रसिक व स्वामीभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या यशाचे श्रेय दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यासोबतच तमाम स्वामीभक्तांनाही जाते.”कार्यक्रमात मुरलीधर मोहोळ यांनी प्रवीण तरडे यांच्या कष्टाळू स्वभावाचे कौतुक करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी प्रवीण तरडे यांच्या संघर्षमय प्रवासाचा गौरव करत, त्यांच्या माध्यमातून धर्म, संस्कृती आणि भक्तीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचत असल्याचे सांगितले.

यावेळी अभिनेता प्रसाद ओक, क्षितीश दाते आणि ओम भूतकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी योगदान दिल्याबद्दल लीड मीडियाचे विनोद सातव, अश्विनी तेरणीकर व त्यांच्या टीमचाही गौरव करण्यात आला.
चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी योगदान दिल्याबद्दल अतुल कुडले, रमेश परदेशी व विनोद वणवे यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. कुशल कोंडे, अनुप गोरे आणि मंदार आडकर यांनाही प्रत्येकी एक लाख रुपयांचे मानधन जाहीर करण्यात आले.

यावेळी प्रवीण तरडे यांनी ‘देऊळबंद-१’ आणि ‘देऊळबंद-२’च्या यशानंतर ‘देऊळबंद-३’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. “गुहागर ते अमेरिका” अशी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमास राजेश पांडे, कैलाश वाणी, चाफळकर बंधू, अभिजित पानसे, अवधूत गुप्ते, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, सुबोध भावे, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, अभिजित खांडकेकर, हार्दिक जोशी, विजू माने, सलील कुलकर्णी, श्रीशैल गवंडी, प्रा. शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, सुनील पवार, तुषार मोरे, अंकुश केत, स्वप्निल गायकवाड, दशरथ लोंढे, स्वामीनाथ मुसळे यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

श्री बसवराज माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, करजगीला ‘आदर्श शाळा पुरस्कार’

Next Post

आषाढी वारी २०२६ : लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्हा परिषद सज्ज

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post

आषाढी वारी २०२६ : लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्हा परिषद सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हुंडा मागणी कलम ४९८-अ व ३४ च्या खटल्यातून पती, सासु व दिराची निर्दोष मुक्तता ; फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २४८(१) अन्वये आदेश.

हुंडा मागणी कलम ४९८-अ व ३४ च्या खटल्यातून पती, सासु व दिराची निर्दोष मुक्तता ; फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २४८(१) अन्वये आदेश.

by Janta Sangharsh News
October 8, 2026
0

​प्रतिनिधी - ​सोलापूर विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ व हुंडा मागणी केल्याच्या आरोपाखाली दाखल खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी...

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक ;पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाईची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा.

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक ;पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाईची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा.

by Janta Sangharsh News
October 8, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे पुणे प्रतिनिधी निखिल सुक्रे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील विविध पत्रकार संघटना आक्रमक झाल्या...

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा; अभिनयाचा अष्टपैलू ‘नटसम्राट’ हरपला

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा; अभिनयाचा अष्टपैलू ‘नटसम्राट’ हरपला

by Janta Sangharsh News
October 8, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार, संवेदनशील आणि प्रभावी अभिनयाने रसिकांच्या मनावर अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ...

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमबापू खेलबुडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव.

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमबापू खेलबुडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव.

by Janta Sangharsh News
October 7, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय यशवंत पाध्ये यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या...

“साहेबांनी शब्द दिला… आणि तो पूर्ण केला! १४ हजारांहून अधिक शिलाई मशीनचे वाटप.”शब्दांकन – श्री. राजकुमार हिवरकर पाटील, जिल्हाप्रमुख (शिवसेना शिंदे गट)

“साहेबांनी शब्द दिला… आणि तो पूर्ण केला! १४ हजारांहून अधिक शिलाई मशीनचे वाटप.”शब्दांकन – श्री. राजकुमार हिवरकर पाटील, जिल्हाप्रमुख (शिवसेना शिंदे गट)

by Janta Sangharsh News
October 7, 2026
0

प्रतिनिधी – सोलापूर “एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश झाला की काम थांबत नाय… ते थेट पूर्ण होतं!” या भूमिकेतून महिलांच्या स्वावलंबनाला...

कारंब्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान; मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर

कारंब्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान; मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर

by Janta Sangharsh News
October 6, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत कारंबा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले...

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

Load More

वेबसाईट दर्शक

0023301

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697