
प्रतिनिधी -सोलापूर
महाराष्ट्र राज्य : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा, तसेच १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी क्रांतीसूर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हलगीनाद आंदोलन करण्यात आले.
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, सामाजिक प्रबोधन आणि लोकशाहीर म्हणून केलेल्या कार्यातून समाजाच्या वंचित घटकांना आवाज दिला. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, तसेच त्यांच्या जयंतीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात क्रांतीसूर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आदर्श धडे, सामाजिक कार्यकर्ते लखन गायकवाड, किशोर जाधव सर, उमेश काळे, यूके ग्रुपचे संस्थापक रोहन लोंढे, सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी पेठे, निवृत्त पोलीस अधिकारी श्रीकांत बोराडे, माजी खादी ग्रामोद्योग अधिकारी महादेव भोसले, लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष साक्षांत लोखंडे, मध्यवर्ती अध्यक्ष अनिल उकरंडे, सेवानिवृत्त पीएसआय सुरेश क्षीरसागर, मातंग शक्ती सेनेचे रोहित गायकवाड, अजय धडे, महेश धडे, रितेश शिंदे, मल्हारी कांबळे यांच्यासह क्रांतीसूर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी, सदस्य आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनाच्या माध्यमातून शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा योग्य सन्मान करावा, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.















