
प्रतिनिधी- सोलापूर
येथील श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिक श्री. महावीर सुभाषचंद्र आळंद यांना ‘आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार’ देऊन नुकतेच गौरविण्यात आले. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, श्री. आळंद यांनी सपत्नीक हा सन्मान स्वीकारला.
स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (SVERI), पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार वितरण सोहळा’ नुकताच उत्साहात पार पडला. शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल श्री. आळंद यांना हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी यांच्यासह सर्व सन्माननीय विश्वस्त, प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार काळे, उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्री. महावीर आळंद यांचे मनापासून अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240
















