Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा न्यायालयात जगदीश यांचा मोठा कायदेशीर विजय; दिवाणी न्यायालयाचा दावा फेटाळण्याचा आदेश रद्द, प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी वर्ग-अ‍ॅड. श्रीनिवास कटकूर यांचा युक्तिवाद ठरला निर्णायक.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
August 30, 2026
in solapur`, Crime
0
सोलापूर न्यायालयात भाडेकरू कार्यकर्ते यांचा मोठा विजय; मकान मालकाचा ताबा मिळवण्याचा दावा रद्द.
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी – सोलापूर:

सोलापूर येथील व्यावसायिक जगदीश यांनी दाखल केलेल्या नियमित दिवाणी अपीलात मे. जिल्हा न्यायालयाने shri S .D. Indalkar Saheb यांनी मे.कनिष्ठ दिवाणी न्यायालयाचा दावा फेटाळण्याचा आदेश रद्दबातल ठरवत जगदीश यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 

ॲडहॉक जिल्हा न्यायाधीश-१ एस. डी. इंदलकर यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला असून मूळ दावा पुन्हा पूर्ववत नोंदवून गुणवत्तेवर (Merits) चालवण्याचे आदेश दिले आहेत.

प्रकरणाची थोडक्यात पार्श्वभूमी:

जगदीश यांनी संतोष यांच्याकडून साखर पेठेतील महानगरपालिका घर ही ५१५ चौ. फुटांची मिळकत ९ लाख रुपयांत खरेदी करण्याचे ठरवून २८/०८/२०२५ रोजी साठेखत केले होते. त्यापोटी ५ लाख रुपये धनादेशाद्वारे अदा करून एका खोलीचा ताबाही मिळवला होता. मात्र, ठरलेल्या तीन महिन्यांच्या मुदतीपूर्वीच संतोष यांनी मिळकत अन्य व्यक्तीला विकण्याचा व ताबा हिरावून घेण्याचा प्रयत्न केल्याने जगदीश यांनी मे.दिवाणी न्यायालयात कायमस्वरूपी मनाई हुकूमाचा (Perpetual Injunction) दावा दाखल केला होता.

त्यावर प्रतिवादी संतोशने ‘ऑर्डर ७, रूल ११’ अन्वये अर्ज (Exh. 13) करून दावा चालवण्यास कायदेशीर कारण (Cause of Action) नाही, असा दावा केला. 

६ व्या सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) यांनी तो अर्ज मंजूर करत ०९/०२/२०२६ रोजी जगदीश यांचा दावा फेटाळला होता.

अपील न्यायालयात अ‍ॅड. श्रीनिवास कटकूर यांचा प्रभावी युक्तिवाद:

दिवाणी न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध जगदीश यांनी मे. जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले. जगदीश यांच्या वतीने निष्णात विधिज्ञ अ‍ॅड. श्रीनिवास कटकूर (Adv. Srinivas Katkur) यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद मांडला.

 * अ‍ॅड. श्रीनिवास कटकूर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, दावा फेटाळताना केवळ दाव्यातील मजकूर विचारात घेणे आवश्यक असते, प्रतिवादीचा बचाव नव्हे.

* मनाई हुकूम मागण्याचे कारण आणि खरेदीखत करून घेण्याचे (Specific Performance) कारण स्वतंत्र असून, मुदत संपण्यापूर्वीच प्रतिवादीने मिळकतीत तिसऱ्या व्यक्तीचा संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने मनाई हुकूमाचा दावा पूर्णपणे योग्य व कायद्यानुसार ग्राह्य आहे.

* विविध न्यायनिर्णयांचा दाखला देत कनिष्ठ न्यायालयाने दिलेला आदेश कायद्याला धरून नसल्याचे अ‍ॅड. कटकूर यांनी सिद्ध केले.

न्यायालयाचा निकाल:

जिल्हा न्यायालयाने अ‍ॅड. श्रीनिवास कटकूर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत कनिष्ठ न्यायालयाचा दावा फेटाळण्याचा आदेश व हुकूमनामा रद्द केला. तसेच मूळ दिवाणी दावा पूर्ववत क्रमांक देऊन पुन्हा गुणवत्तेवर चालवण्यासाठी मे.कनिष्ठ दिवाणी न्यायालयाकडे पाठवला आहे. या निकालामुळे जगदीश यांना मोठा न्याय मिळाला आहे. 

याकामी जगदीश यांचेवतीने adv. श्रीनीवास कटकुर व adv. आकाश आयंची यांनी काम पाहिले आहे.

Previous Post

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या अतिरिक्त सरचिटणीसपदी अरुणभाऊ क्षीरसागर, उपाध्यक्षपदी गिरीश जाधव यांची एकमताने निवड.

Next Post

पैगंबर जयंतीनिमित्त ब्रिलियंट ग्रुपकडून सय्यद बुखारी दर्ग्यास पाण्याच्या टाकीची भेट.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
पैगंबर जयंतीनिमित्त ब्रिलियंट ग्रुपकडून सय्यद बुखारी दर्ग्यास पाण्याच्या टाकीची भेट.

पैगंबर जयंतीनिमित्त ब्रिलियंट ग्रुपकडून सय्यद बुखारी दर्ग्यास पाण्याच्या टाकीची भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022696

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697