Wednesday, October 7, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

गॅस सिलेंडरसाठी ४५ दिवसांची प्रतीक्षा का?- हिवरकर पाटील;महिलांच्या ज्वलंत प्रश्नासाठी शिवसेना मैदानात; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदन.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
September 1, 2026
in solapur`
0
गॅस सिलेंडरसाठी ४५ दिवसांची प्रतीक्षा का?- हिवरकर पाटील;महिलांच्या ज्वलंत प्रश्नासाठी शिवसेना मैदानात; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदन.
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : प्रतिनिधी

भारत पेट्रोलियम कंपनीकडून गॅस सिलेंडरच्या बुकिंगसाठी तब्बल ४५ दिवसांची मुदत ठेवण्यात आल्याने ग्राहकांना, विशेषतः महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर यांच्याकडे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात काही काळ गॅस टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून शहरी व ग्रामीण भागासाठी काही निकष निश्चित करण्यात आले होते. मात्र, युद्धजन्य परिस्थिती निवळल्यानंतरही भारत पेट्रोलियम कंपनीकडून गॅस बुकिंगसाठी ४५ दिवसांची प्रतीक्षा ठेवण्यात आली आहे.

इतर गॅस कंपन्यांकडून सुमारे २५ दिवसांच्या कालावधीनंतर बुकिंगची सुविधा उपलब्ध होत असताना भारत पेट्रोलियमकडून अद्याप ४५ दिवसांची मुदत कायम असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. विशेषतः महिलांना स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध करून घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

“गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी ४५ दिवस वाट पाहायची का? महिलांच्या या ज्वलंत प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे,” अशी भूमिका हिवरकर पाटील यांनी व्यक्त केली.

निवेदनाद्वारे भारत पेट्रोलियम कंपनीकडून होत असलेल्या गॅस पुरवठ्याबाबत योग्य ती चौकशी करून ग्राहकांना नियमित व सुरळीत गॅस पुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी ओबीसी महासंघाचे प्रदेश उपप्रमुख तानाजीराव साठे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख तानाजीराव भोळे पाटील, तालुकाप्रमुख शहाजी काळे, पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष एन. के. साळवे, माळशिरस शहर संघटक पोरे भाऊ, विद्यार्थी सेनेचे प्रमुख शिवदत्त भोळे पाटील, दहिगाव शहर प्रमुख दत्ता बोडरे आदी उपस्थित होते.

जनता संघर्ष न्यूज,सोलापूर

संपादक – सिद्धार्थ भडकुंबे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240

Previous Post

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलातील प्रा मयुर स्वामी यांना राज्यस्तरीय ‘गुरुजन गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान.

Next Post

भटके-विमुक्त समाजाच्या सांस्कृतिक हक्कांसाठी लक्ष्मण आबा भोसले यांचा पाठिंबा.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
भटके-विमुक्त समाजाच्या सांस्कृतिक हक्कांसाठी लक्ष्मण आबा भोसले यांचा पाठिंबा.

भटके-विमुक्त समाजाच्या सांस्कृतिक हक्कांसाठी लक्ष्मण आबा भोसले यांचा पाठिंबा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कारंब्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान; मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर

कारंब्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान; मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर

by Janta Sangharsh News
October 6, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत कारंबा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले...

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

Load More

वेबसाईट दर्शक

0022899

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697