
प्रतिनिधी – सोलापूर
भटके-विमुक्त जमातीच्या विविध मागण्यांची शासनाकडून अपेक्षित पूर्तता होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक ३१ ऑगस्ट भटके-विमुक्त दिनानिमित्त भटके-विमुक्त समाजाच्या सांस्कृतिक हक्कांसाठी आयोजित आंदोलनाला छत्रपती भोसले राजे प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण (आबा) भोसले यांनी जाहीर पाठिंबा दिला.
पुणम गेट येथील आंदोलन स्थळी आयोजित कार्यक्रमात भटके-विमुक्त, आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. समाजाच्या सांस्कृतिक हक्कांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ, सामाजिक न्याय आणि मूलभूत सुविधांसाठी प्रभावीपणे आवाज उठविण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी माजी महापौर सौ. नलिनीताई चंदेले, छप्परबंद समाजाचे प्रदेशाध्यक्ष मोहंमद इंडिकर, छत्रपती भोसले राजे प्रतिष्ठानच्या आधारस्तंभ सौ. वंदनाताई भिसे, शिकलकर समाजाचे प्रदेशाध्यक्ष जे. एम. शिकलकर, छप्परबंद समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष एम. के. भागोजी, सदस्य रहीमान शेख, के. आर. कोरे, तसेच सिद्धार्थ भडकुंबे, संपादक – जनता संघर्ष न्यूज यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
अखिल भारतीय हिंदू गोंधळी समाज सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संजयजी शिंदे (मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहराध्यक्ष लक्ष्मण (आबा) भोसले आणि शहर सचिव सौ. वंदनाताई मारुती भिसे यांच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.भटके-विमुक्त समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि सांस्कृतिक हक्कांच्या संरक्षणासाठी भविष्यातही संघटितपणे लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240
















