
प्रतिनिधी-अक्कलकोट
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचा संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वामी समर्थांची कोरीव मूर्ती व कृपावस्त्र देऊन दोन्ही मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.


यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी अन्नछत्र मंडळाच्या सामाजिक, धार्मिक आणि भाविकाभिमुख सेवाकार्याचे कौतुक केले. मंडळाची आजवरची वाटचाल समाधानकारक असून, भाविकांसाठी सुरू असलेले सेवाकार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. पवार कुटुंबीयांचे श्री स्वामी समर्थांवर नितांत श्रद्धास्थान असून, अक्कलकोटशी आपले भावनिक नाते असल्याची भावना सुळे यांनी व्यक्त केली.आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही अन्नछत्र मंडळाच्या विविध सेवाभावी उपक्रमांचे कौतुक केले. अक्कलकोटचे नाव देश-विदेशातील भाविकांपर्यंत पोहोचविण्यात मंडळाचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. श्रद्धा, सेवा आणि आधुनिक सुविधांचा सुंदर संगम अन्नछत्र मंडळाने घडवून आणला असून, त्याचे कार्य प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार आव्हाड यांनी काढले.
या सत्कार सोहळ्यास पालखी परिक्रमा प्रमुख संतोष भोसले, शिवराज स्वामी, मैनोद्दीन कोरबु, सरफराज शेख, प्रशांत शिंदे, महांतेश स्वामी, शिरू कुंभार, गोकुळ पाटील, संतोष माने, अशपाक काझी यांच्यासह अन्नछत्र मंडळाचे पदाधिकारी, सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक -सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240















