Wednesday, October 7, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

वृक्षतोडीला ब्रेक; आरटीओ परिसरात हरित मोहीमेला वेग-वड,पिंपळ वाचविण्याच्या सूचना; १५ वृक्षांचे पुनर्लागवड, तब्बल ५०० नव्या वृक्षांची लागवड.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
September 5, 2026
in solapur`
0
वृक्षतोडीला ब्रेक; आरटीओ परिसरात हरित मोहीमेला वेग-वड,पिंपळ वाचविण्याच्या सूचना; १५ वृक्षांचे पुनर्लागवड, तब्बल ५०० नव्या वृक्षांची लागवड.
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी – सोलापूर

आरटीओ परिसरातील वृक्षतोडीच्या हालचालींची माहिती मिळताच सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अनावश्यक वृक्षतोड कोणत्याही परिस्थितीत होऊ नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याने आरटीओ परिसरातील हिरवाईला मोठा दिलासा मिळाला आहे.

आरटीओ परिसरात एकूण ११३ वृक्ष असून, त्यापैकी ३४ वृक्षतोडीसाठी परवानगी मागण्यात आली होती. यामध्ये शेवरीच्या वृक्षांचा समावेश असल्याने नियमानुसार व मंजूर परवानगीनुसार आवश्यक वृक्षतोड करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, वड, पिंपळ यांसारख्या देशी व पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण वृक्षांची तोड न करता त्यांचे पुनर्लागवड करण्यावर भर देण्याचे निर्देश उपमहापौर देवकर यांनी दिले.

पुनर्लागवड शक्य असलेल्या १५ वृक्षांचे रिप्लांटेशन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच परवानगी नसलेल्या कोणत्याही वृक्षाला हात लावू नये आणि वृक्षतोडीच्या प्रक्रियेत सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी उपमहापौर देवकर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांची भेट घेऊन वृक्षतोडीच्या वेळी प्रशासनाने विशेष दक्षता घेण्याची विनंती केली. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आश्वासन विजय पाटील यांनी दिले.

वृक्षतोडीची भरपाई नव्हे, हरित क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न

दरम्यान, प्रभाग क्रमांक २३ मधील मोकळ्या जागेत ५ फूटांपेक्षा मोठ्या आकाराची सुमारे ५०० वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वृक्षलागवडीसाठी प्रत्येक झाडामागे ५ हजार रुपये याप्रमाणे ७५ हजार रुपये अनामत रक्कम महापालिकेत जमा करण्यात आली आहे.

प्रादेशिक परिवहन विभाग आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या समन्वयातून या परिसरात वृक्षलागवड तसेच वृक्षसंवर्धन करण्यात येणार आहे. त्यामुळे आरटीओ परिसरात विकासकामांसोबतच हरित क्षेत्र वाढविण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार आहे.उपमहापौर देवकर यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे ‘विकास हवा, पण हिरवाईच्या किंमतीवर नको’ असा संदेश देण्यात आला आहे. वृक्षतोडीऐवजी शक्य तिथे पुनर्लागवड आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणावर नव्याने वृक्षलागवड करण्याचा निर्णय पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

यावेळी परिवहन निरीक्षक प्रिया रोडगे, आरटीओ विभागातील कर्मचारी, उद्यान विभागातील कर्मचारी तसेच पर्यावरणदूत डॉ. मनोज देवकर आदी उपस्थित होते.

“वृक्षतोड हा शेवटचा पर्याय असावा. शक्य असेल तेथे वृक्षांचे पुनर्लागवड करून त्यांचे संवर्धन करणे आणि त्यासोबत नव्याने वृक्षलागवड करणे हीच काळाची गरज आहे,” असा संदेश उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी दिला.

जनता संघर्ष न्यूज,सोलापूर 

संपादक – सिद्धार्थ भडकुंबे 

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240

Previous Post

क्राइम पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विशाल भांगे यांची एकमताने निवड;तर खजिनदार रवी मस्के, सचिव परशुराम कोकणे.

Next Post

ग्राहकांना रुचकर, ताजे आणि दर्जेदार नाश्त्याचा आस्वाद मल्हार उपहार गृहाचा थाटात शुभारंभ; चविष्ट नाश्त्यासाठी एकदा अवश्य भेट द्या!

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
ग्राहकांना रुचकर, ताजे आणि दर्जेदार नाश्त्याचा आस्वाद मल्हार उपहार गृहाचा थाटात शुभारंभ; चविष्ट नाश्त्यासाठी एकदा अवश्य भेट द्या!

ग्राहकांना रुचकर, ताजे आणि दर्जेदार नाश्त्याचा आस्वाद मल्हार उपहार गृहाचा थाटात शुभारंभ; चविष्ट नाश्त्यासाठी एकदा अवश्य भेट द्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कारंब्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान; मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर

कारंब्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सन्मान; मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर

by Janta Sangharsh News
October 6, 2026
0

प्रतिनिधी -सोलापूर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत कारंबा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले...

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

Load More

वेबसाईट दर्शक

0022899

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697