
प्रतिनिधी – सोलापूर
प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. काही कारणांमुळे एखाद्या व्यक्तीला दिव्यांगत्व किंवा अंधत्व आले असेल आणि त्या व्यक्तीने प्रशिक्षण घेऊन स्वतःला सक्षम बनविले असेल, तर त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रा. अजय बनसुडे यांनी केले.

नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड संस्थेच्या सुशीलकुमार शिंदे दिव्यांग निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भोजे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.






याप्रसंगी सोलापुरातील प्रसिद्ध कलाकार तथा प्रा. अजय बनसुडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच केंद्रातील सर्व मुला-मुलींना खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे यांनी आपल्या भाषणातून दिव्यांग व अंध व्यक्तींच्या जिद्दीचे आणि क्षमतेचे कौतुक केले. देवाने काही बाबतीत कमी दिले असले तरी दिव्यांग व अंध व्यक्ती अनेकदा डोळस व धडधाकट व्यक्तींपेक्षाही अधिक जिद्दीने आणि आत्मविश्वासाने जीवन जगत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. शिवकुमार पाटील यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर श्री. प्रकाश काळे यांनी आभार प्रदर्शन केले. विशेष म्हणजे, शिवकुमार पाटील आणि प्रकाश काळे हे दोघेही दृष्टिहीन असूनही त्यांनी अतिशय आत्मविश्वासाने व प्रभावीपणे आपली जबाबदारी पार पाडली.
केंद्राचे वस्तीगृह अधीक्षक श्री. रियाज मुल्ला यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी भाग्यश्री धपाटे व प्रा. बनसुडे यांची समयोचित भाषणे झाली.
या कार्यक्रमास विक्रम जमदाडे, आशा भडकुंबे, प्रदीप कांबळे, अंजली सोमवंशी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे यांनी दृष्टिहीन श्री. शिवकुमार पाटील यांची घेतलेली मुलाखत विशेष गाजली. तसेच दृष्टिहीन श्री. गुणानंद बिहाडे यांनी सादर केलेले गीत उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरले आणि कार्यक्रमाची सुंदर सांगता झाली.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240















