सोलापूर | प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे यंदाही सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई झाडे – खेलबुडे यांच्या वतीने गणपती गौरी आरास स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त बंधू-भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

घरगुती गणपती व गौरीच्या आरासीतून नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच सुंदर आणि संदेशपूर्ण आरासाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी काही नियम निश्चित करण्यात आले असून, टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा वापर, पारंपारिक पद्धतीने आरास तसेच कमी खर्चात समाजाला संदेश देणारी आरास या बाबींना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून, प्रथम क्रमांकासाठी दोन पैठणी साड्या, द्वितीय क्रमांकासाठी एक पैठणी साडी आणि तृतीय क्रमांकासाठी आकर्षक गृहउपयोगी वस्तू देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक सरप्राईज गिफ्ट देऊन प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे परीक्षण १८ व १९ तारखेला करण्यात येणार असून, परीक्षक प्रत्यक्ष स्पर्धकांच्या घरी भेट देऊन गणपती-गौरीची आरास पाहणार आहेत.त्यामुळे सर्व गणेशभक्तांनी व महिलांनी आपल्या कल्पकतेला आणि कलागुणांना वाव देत या स्पर्धेत सहभागी व्हावे आणि आकर्षक बक्षिसे जिंकावीत, असे आवाहन सुवर्णाताई झाडे – खेलबुडे, सामाजिक कार्यकर्त्या यांनी केले आहे.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक -सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

















