
कामती खुर्द | प्रतिनिधी
कामती खुर्द येथील स्वर्गीय दाजीकाका गोडबोले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात १९ सप्टेंबर २०२६ रोजी गणेशोत्सवानिमित्त गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या गायनकलेचे सादरीकरण केले.

स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून संगीत विशारद कुमारी गायत्री पेडेंटी मॅडम व सोलापूरचे निवेदक, गायक व पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे उपस्थित होते . त्यांनी विद्यार्थ्यांच्या गीतगायनाचे परीक्षण करून त्यांच्या सादरीकरणातील विविध गुणांचे कौतुक केले. प्रत्येक विद्यार्थ्याने अतिशय सुंदर पद्धतीने गीत सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.
स्पर्धेत लहान गट, मोठा गट आणि महाविद्यालयीन गट अशा तीन गटांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक निवडण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
ही गीत गायन स्पर्धा परीक्षा व स्पर्धा समितीचे अध्यक्ष एस. टी. पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्राचार्य गेंगाणे सर आणि पर्यवेक्षक डी. एस. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुकेश आठवले सर यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओहोळ सर यांनी केले, तर आभार एस. टी. पाटील सर यांनी मानले. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षकवृंदाने विशेष सहकार्य केले.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579837240















