Tuesday, October 6, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

सोलापुरात दरोड्याच्या तयारीत असलेली ७ जणांची सराईत टोळी जेरबंद; पिस्तूल, ५ जिवंत राऊंडसह १०.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
September 23, 2026
in solapur`, Crime
0
सोलापुरात दरोड्याच्या तयारीत असलेली ७ जणांची सराईत टोळी जेरबंद; पिस्तूल, ५ जिवंत राऊंडसह १०.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त.
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी – सोलापूर

सोलापूर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला शहर गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद केले. एक देशी बनावटीचे पिस्तूल, पाच जिवंत राऊंड, दोन तलवारी, तीन खंजीर, दोन कटावणी, छन्नी, लांब दोरखंड, हॅन्डग्लोज, दोन नंबर प्लेट, कलर स्प्रे, सात मोबाईल, चारचाकी आणि मोटारसायकल असा तब्बल १० लाख २९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कारवाई २० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, मुळेगाव रोड परिसरात करण्यात आली.

गुप्त माहिती मिळताच पोलिसांचा सापळा

शहरातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांना आळा घालणे आणि दाखल गुन्ह्यांचा तपास करण्याच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेचे पथक एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई अमोल यादव यांना गोपनीय माहिती मिळाली.

अमर ज्योती नगर, नरसिंग नगरजवळ, मुळेगाव रोड येथील प्लॉट क्रमांक ८३ परिसरात काहीजण दरोडा टाकण्याच्या तयारीत जमले असून त्यांच्याकडे घातक शस्त्रे आणि वाहने आहेत, अशी माहिती मिळाली.सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना दिली. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

सात संशयितांना शिताफीने पकडले

पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता एका काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनाजवळ सात जण संशयास्पदरीत्या थांबलेले आढळून आले. दरोड्यासारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी सापळा रचून सर्व सात जणांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत 

मनदीपसिंग दयासिंग संधू (४३), नांदेड

बलप्रीतसिंग सतनामसिंग खैरा (२५), नांदेड

अंकुर रामकुमार प्रतापसिंग (२८), जि. पटना, बिहार

लक्ष्मण नामदेव जगताप (३५), छत्रपती संभाजीनगर

सुखदेवसिंग बलविंदरसिंग गिल (४२), पंजाब

दिलीपसिंग हरीसिंग पवार खालसा (३४), नांदेड

राजेश कन्नीराम राठोड (४४), सोलापूर

त्यांच्याकडून महिंद्रा XUV 500 (MH 12 HB 7700) आणि यामाहा मोटारसायकल (TG 07 AJ 6467) अशी दोन वाहनेही मिळून आली.

वाहनात आढळला शस्त्रसाठा

पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता अंकुर रामकुमार प्रतापसिंग याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि पाच जिवंत राऊंड आढळून आले.त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दोन तलवारी, तीन खंजीर, दोन कटावणी, एक छन्नी, लांब दोरखंड, तीन जोड्या हॅन्डग्लोज, दोन नंबर प्लेट, एक कलर स्प्रे बॉटल आणि सात मोबाईल फोन आढळून आले.

या साहित्याबाबत सुरुवातीला आरोपींनी पोलिसांना समाधानकारक माहिती दिली नाही. मात्र पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपी राजेश कन्नीराम राठोड याने, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्या रात्री सोलापूर शहरात दरोडा टाकून लूट करण्याची तयारी केली असल्याचे सांगितले.

आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे

पोलिसांच्या तपासात अटक केलेल्या आरोपींपैकी काहींवर यापूर्वीच खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि हत्यार कायद्यांतर्गत विविध गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

विशेषतः दिलीपसिंग हरीसिंग पवार खालसा याच्यावर नांदेड, बीड आणि इतर ठिकाणी खून, खुनाचा प्रयत्न, हत्यार कायदा तसेच जबरी चोरीसारखे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मनदीपसिंग दयासिंग संधू, अंकुर प्रतापसिंग, लक्ष्मण जगताप आणि राजेश राठोड यांच्याविरुद्धही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.

१० लाख २९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत पोलिसांनी एकूण १०,२९,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये पिस्तूल, जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे, दरोड्यासाठी वापरता येणारे साहित्य, मोबाईल, वाहनांचा समावेश आहे.

सातही आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८४७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४), भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७(१)(२), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेची मोठी कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशेष शाखा) डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव, निलेश सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे, मनोज मोरे तसेच गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली.

पोलिसांच्या या कारवाईमुळे सोलापूर शहरात संभाव्य दरोड्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला असून, या टोळीचा आणखी कोणत्या गुन्ह्यांशी संबंध आहे का, तसेच जप्त शस्त्रे व साहित्य कुठून आणण्यात आले, याचा पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

सोलापूरच्या उमेदचे ग्रामविकास मंत्री यांनी केले कौतुक;गणेशोत्सवात केली १.६५ कोटींची ऐतिहासिक उलाढाल.

Next Post

शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री फडणवीस; कारंब्यात खरीप पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी;दुष्काळसदृश परिस्थितीची घेतली माहिती; शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री फडणवीस; कारंब्यात खरीप पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी;दुष्काळसदृश परिस्थितीची घेतली माहिती; शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद.

शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री फडणवीस; कारंब्यात खरीप पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी;दुष्काळसदृश परिस्थितीची घेतली माहिती; शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

“विद्यार्थ्यांनो, प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगा” – मुनिश्री सुप्रभसागर महाराज ; जैन गुरुकुलात विद्यार्थ्यांना मुनिश्रींचे प्रेरणादायी उद्बोधन.

by Janta Sangharsh News
October 5, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ...

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. तहसीन जावेद जमादार यांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सुयश विद्यालय, सोलापूर येथील शिक्षिका प्रा. तहसीन जावेद...

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

बुरुड शक्ती नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी अनिकेत वडतीले.

by Janta Sangharsh News
October 3, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर बुरुड शक्ती नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय सांस्कृतिक ट्रस्ट मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी श्री. अनिकेत वडतीले यांची निवड करण्यात आली....

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

गांधी जयंतीनिमित्त सोलापुरात काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना अभिवादन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

सोलापूर : प्रतिनिधी जगाला अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने...

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

श्रमिकांच्या लॉंग मार्चला ऐतिहासिक रूप द्या! कॉ. आडम मास्तरांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर, स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी...

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर गांधी जयंतीदिनी आंदोलन; महांतेश्वर कट्टीमनी यांचा आत्मदहनाचा इशारा

by Janta Sangharsh News
October 2, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महांतेश्वर कट्टीमनी सर यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी...

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा;सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठांचा सन्मान.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी- दक्षिण सोलापूर  पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा...

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

सेवा संकल्प अभियान अंतर्गत उमेदच्या वतीने रुक्मिणी सप्ताह चे आयोजन.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत...

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

श्रमिकांच्या प्रश्नांसाठी १६ नोव्हेंबरला २५ हजारांचा मुंबईवर ‘पायी लाँग मार्च – ’रे नगर, कॉ. गोदुताई नगर, विडी, यंत्रमाग, बांधकाम व असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी कॉ. नरसय्या आडम मास्तरांची पत्रकार परिषद.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर रे नगरचा रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करावा, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी येथील नागरी सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात...

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत खाऊ वाटप; सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा.

by Janta Sangharsh News
October 1, 2026
0

सोलापूर - प्रतिनिधी श्री मंगलदास क्रीडा व प्रसारक मंडळ संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळेत विश्वशांती दूत डॉ. सुधीर...

Load More

वेबसाईट दर्शक

0022696

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697