
प्रतिनिधी -अक्कलकोट
शहरातील प्रसिद्ध थ्री व्हीलर स्पेअर पार्ट विक्री केंद्र असलेल्या संजरी ऑटोमोबाईल्स या दुकानाचे नवीन व प्रशस्त जागेत स्थलांतर करण्यात आले असून त्याच्या शुभारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक व श्री वटवृक्ष देवस्थानचे चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या शुभहस्ते प्रोप्रायटर रफिक पठाण व मोईन पठाण यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन सत्कार करून त्यांना व्यवसायाच्या भरभराटीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी चेअरमन व नगरसेवक महेश मालक इंगळे म्हणाले की प्रामाणिक सेवा आणि ग्राहकांचा विश्वास यांच्या जोरावर संजरी ऑटोमोबाईल्सने अल्पावधीतच आपला नावलौकिक निर्माण केला आहे.


अक्कलकोटच्या व्यापारी क्षेत्रात अशा तरुण उद्योजकांची गरज आहे. नवीन जागेत या व्यवसायाची उत्तरोत्तर प्रगती व भरभराट होवो अशा माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रथमेश मालक इंगळे, ज्येष्ठ नगरसेवक यशवंत तात्या धोंगडे, संतोष पराणे मालक, नगरसेवक अविनाश मडिखांबे, नगरसेवक मुस्तफा बळोरगी, ओंकारेश्वर उटगे, विश्वनाथ देवरमनी सर, कुमार हत्तुरे, रमेश कणबसे, मनोज जगताप सर, संतोष जवळगे, दत्तात्रय कटारे, विद्याधर गुरव सर, सिद्धाराम बिडवे, रमेश शिंदे सर, बाळासाहेब एकबोटे, आप्पा गवळी, स्विमिंग ग्रुपचे सर्व सदस्य तसेच महेश मालक इंगळे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पठाण परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















