Monday, November 23, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

शिरवळ येथे सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण वर्ग संपन्न.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
September 25, 2026
in solapur`
0
शिरवळ येथे सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण वर्ग संपन्न.
0
SHARES
158
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी – सोलापूर

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जात्मक व लोकभिमुख आरोग्यसेवा मिळाव्यात. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवळ तालुका अक्कलकोट येथे सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण दिनांक 23 व 24 सप्टेंबर 2026 रोजी उत्साहात पार पडले.

ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा व यंत्रणा अधिक सक्षम बळकटीकरण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोपरवाड तसेच प्राचार्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र पुणे डॉ.सुहास कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय प्रशिक्षण उत्सहात पार पडले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले यामध्ये

1)गरोदरपणातील प्रसुती अंतर्गत व प्रसुती पक्षात काळजी

2 ) नवजात शिशु आणि अर्भकाच्या आरोग्यसेवा

3 ) बालक व किशोरावस्थातील आरोग्यसेवा

4 ) कुटुंब नियोजन व गर्भनिरोधक सेवा

5) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि संसर्गिक आजाराचे व्यवस्थापन

6) सामान्य संसर्गित व किरकोळ आजाराचे व्यवस्थापन

7) अससर्गजन्य आजाराची छाननी व प्रतिबंधात्मक

8) डोळे व कान समस्यांचे प्राथमिक काळजी

9) मौखिक आरोग्याची मूलभूत काळजी

10 ) वर्धापकाळातील आणि वेदनाशक काळजी

11 ) तात्कालीन वैदकीय सेवा( Emergency Care )

12) मानसिक आरोग्य व समुपदेशन

13) योग व आयुष्य उपचार पद्धतीचा अवलंब

14) नेतृत्व गुण संवाद कौशल्य

महिलांचे आरोग्य व पुरुषांचा सहभाग या सर्व आरोग्य सेवा विषयाचा सहभाग होता. यावेळी सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्यसेवा( CPHC ) अंतर्गत प्रतिबंधात्मक व उपचारत्मक सेवा तसेच आरोग्य संस्थेचे गुणवत्ता कशी वाढावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या अद्यावत ज्ञान व कौशल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक प्रभावी व दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मोठी मदत होणार आहे. प्रशिक्षण दरम्यान अतिरिक्त जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ नंदकिशोर घाडगे, तालुका आरोग्याधिकारी डॉ अश्विन करजखेडे वैदकीय अधिकारी डॉ श्रीकांत कुलकर्णी डॉ रोहन वायचळ प्रशिक्षक तथा वैद्यकीय अधिकारी डॉ शिवलीला माळी आरोग्य सहायिका कलावती चव्हाण वैद्यकीय अधिकारी डॉ साधना पाटील डॉ शबनम शेख जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे शाखा सदस्य रफिक शेख आरोग्य कर्मचारी समुदय आरोग्य अधिकारी व आशा कर्मचारी बहुसंख्याने उपस्थित होते.

जनता संघर्ष न्यूज,सोलापूर

संपादक – सिद्धार्थ भडकुंबे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

 

Previous Post

पंढरीत रविवारी रंगणार सुरांची मैफल; जिल्हास्तरीय कराओके स्पर्धेची रंगत वाढणार-शंभरहून अधिक स्पर्धकांचा सहभाग; रसिकांसाठी लकी ड्रॉसह आकर्षक बक्षिसांची मेजवानी.

Next Post

नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते संजरी ऑटोमोबाईल्सच्या दालनाचा शुभारंभ.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते संजरी ऑटोमोबाईल्सच्या दालनाचा शुभारंभ.

नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते संजरी ऑटोमोबाईल्सच्या दालनाचा शुभारंभ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी नेत्ररोग, मोतीबिंदू तपासणी व...

पत्रकार सुरक्षा समितीचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. राम हुंडारे यांना जाहीर

पत्रकार सुरक्षा समितीचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. राम हुंडारे यांना जाहीर

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल. प्रतिनिधी - सोलापूर पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी राज्यभर लढा...

डफरीन चौक आयटीआयच्या आलिशा शेखची अखिल भारतीय परीक्षेत ९६ टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांकाची झेप!

डफरीन चौक आयटीआयच्या आलिशा शेखची अखिल भारतीय परीक्षेत ९६ टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांकाची झेप!

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  डफरीन चौक येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), सोलापूर येथील प्रशिक्षणार्थी आलिशा शेख हिने अखिल भारतीय व्यवसाय...

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

पंढरीच्या पावन भूमीत प्रशासनाच्या कार्याचा गौरव; लाखो वारकऱ्यांच्या सेवेला मिळाली कौतुकाची थाप!  प्रतिनिधी - पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पावन नगरीत कार्तिकी...

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा...

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

by Janta Sangharsh News
November 17, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील बोगस जातीचे दाखले तपासून ते रद्द करण्यात यावेत, तसेच पुणे...

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

by Janta Sangharsh News
November 16, 2026
0

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची सूचना; टंचाई निवारण, जलसंधारण व घरकुल योजनांचाही घेतला आढावा. प्रतिनिधी - सांगोला  पंचायत समिती...

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

औज मंद्रूप येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न; ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प! प्रतिनिधी -:औज मंद्रूप (ता. दक्षिण...

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयामार्फत बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी मार्कंडेय उद्यान, सोलापूर येथे ‘पहाट गाणी’...

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’  सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’ सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  दिवाळीचा सण केवळ दिव्यांच्या रोषणाईपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत इतरांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवण्याच्या उद्देशाने...

Load More

वेबसाईट दर्शक

0045831

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697