
सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शालेय शहरस्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल २ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्य पदकांची कमाई केली. या चमकदार कामगिरीच्या जोरावर विद्यार्थ्यांची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत सोमपा क्रीडा कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने आयोजित शालेय शहरस्तरीय क्रीडा स्पर्धेत ऑर्किड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लॉन टेनिस, स्केटिंग आणि वुशू या क्रीडा प्रकारांत कौशल्य सिद्ध केले. रिषभ गोचडे, मृण्मयी गायकवाड, प्रतीक शिंदे, बाळराजे थोरात, श्रेयश कदम, आराधना कांबळे आणि शिवानी पाटील या खेळाडूंनी पदकांची कमाई केली.उत्कृष्ट तांत्रिक खेळ, जिद्द आणि अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विभागीय स्तरावर आपले स्थान निश्चित केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी, सचिवा सौ. वर्षाताई विभुते, स्कूलचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, मार्गदर्शिका मीना पारखे आणि प्राचार्या रश्मी कुंभार यांनी अभिनंदन केले.
यशस्वी खेळाडूंना स्कूलचे क्रीडा विभाग प्रमुख आनंद लिगाडे, ज्ञानदीप जाधव तसेच प्रशिक्षक महेश झांबरे, अभिजीत रंक, संमित यादवाड आणि रमेश दोडमणी यांचे मार्गदर्शन लाभले.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक -सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहीरातीसाठी सपंर्क -9579838240

















