
प्रतिनिधी – सोलापूर
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्या ठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या विविध पथकांसह आरोग्य विभागाचे पथक कर्तव्यावर तैनात करण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराज तलाव येथे महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलू योगेश यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


दरम्यान, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी प्रभाग क्रमांक १५ मधील नगरसेविका श्रीदेवीताई जॉन अण्णा फुलारे यांच्या एकता मित्र मंडळ येथे श्री गणरायाची आरती व पूजा संपन्न झाली. यावेळी सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने तसेच डबीर मॅडम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. राखी माने यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी कोणापुरे चाळ नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलू योगेश यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आवश्यक सेवा देण्यात आली.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

















