
सोलापूर | शहर प्रतिनिधी
पद्मविभूषण महानायक डॉ. अमिताभ बच्चन यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात त्यांच्या गाजलेल्या चित्रपटगीतांची संगीतमय मैफल रंगणार आहे. पद्मविभूषण महानायक डॉ. अमिताभ बच्चन सेवाभावी संस्था, सोलापूर व ‘सारेगाना ६’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
येत्या रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे हा कार्यक्रम होणार असून, अमिताभ बच्चन यांच्या विविध गाजलेल्या चित्रपटांमधील लोकप्रिय गीतांचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या चित्रपटांतील संगीत आणि गाण्यांनाही प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली आहे. त्यामुळे महानायकाच्या वाढदिनी त्यांच्या सदाबहार गीतांची विशेष मैफल आयोजित करण्यात आल्याने संगीतप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन निःशुल्क करण्यात आले असून सोलापूर शहरातील नागरिक, अमिताभ बच्चन यांचे चाहते तसेच संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संगीतमय कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पद्मविभूषण महानायक डॉ. अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय इप्पाकायल आणि ‘सारेगाना ६’चे प्रमुख अशरफ खान यांनी केले आहे.
महानायकाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली ही संगीतमय मैफल रसिकांसाठी मनोरंजनासोबतच जुन्या लोकप्रिय गीतांच्या आठवणींना उजाळा देणारी ठरणार आहे.
जनता संघर्ष न्यूज ,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

















