
प्रतिनिधी – सोलापूर
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक संचारचे ज्येष्ठ पत्रकार विक्रम खेलबुडे यांची सलग १४ व्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. सरचिटणीसपदी एबीपी माझाचे प्रतिनिधी आफताब शेख, तर खजिनदारपदी दैनिक दिव्य मराठीचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांची निवड करण्यात आली. संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन २०२६-२७ साठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.संघाच्या सभागृहात झालेल्या या सभेच्या प्रारंभी मावळते सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मागील वर्षातील कामकाजाचा अहवाल सादर केला. मावळते खजिनदार किरण बनसोडे यांनी संघाच्या आर्थिक व्यवहारांचा आणि जमाखर्चाचा तपशील सभेसमोर मांडला. उपस्थित सभासदांनी दोन्ही अहवालांना एकमताने मंजुरी दिल्यानंतर नूतन कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजयकुमार राजापूरे, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संतोष सिरसट यांनी जबाबदारी सांभाळली.
नूतन कार्यकारिणी अशी –
उपाध्यक्षपदी अविनाश गायकवाड, नितीन पात्रे, अरविंद मोटे, संगमेश जेऊरे आणि रुपेश हेळवे यांची निवड झाली. चिटणीसपदी अमोल व्यवहारे, रतन (आप्पा) बनसोडे, प्रीतम पंडित आणि लखन अदाटे, तर सहचिटणीसपदी धनंजय मोरे, विनोद हुमनाबादकर आणि रोहित थळवे यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून विजयकुमार राजापूरे, अरुण रोटे, शीतलकुमार कांबळे, समीर कार्यकर्ते, दीपक दुपारगुडे, रवींद्र दंतकाळे, राजेश कुलकर्णी, रवी ढोबळे, श्रीनिवास मावनूर, गौतम गायकवाड, विक्रांत कालेकर, पिंटू विभुते, सचिन जाधव, यशवंत गुरव, नितीन कटके, अंबादास पोळ, मुजम्मील शाहनूरकर, सुदर्शन भालेराव, सागर इप्पलपल्ली, आरती कुसेकर आणि महेश कुलकर्णी यांची निवड झाली. प्रशांत जोशी, शंकर जाधव आणि हेमंत चौधरी यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान
नूतन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर दैनिक सकाळचे संपादक सिद्धाराम पाटील, दैनिक तरुण भारत संवादचे संपादक विजयकुमार देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार नारायण कारंजकर, प्रशांत जोशी आणि राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटितपणे काम करण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.
फाउंडेशन आणि महापौरांच्या सहकार्याचे कौतुक
संघाच्या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी सहकार्य करणाऱ्या शिखर पहारिया फाउंडेशनच्या अभिनंदनाचा ठराव सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या अभिनंदनाचाही ठराव मंजूर करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार मनीष केत यांची महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.
विक्रम(बापू )खेलबुडे यांची अध्यक्षपदी सलग १४ व्यांदा झालेली बिनविरोध निवड ही त्यांच्या नेतृत्वावर सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक मानली जात आहे. नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न, संघटनात्मक उपक्रम आणि पत्रकारांच्या हिताशी संबंधित विषयांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240















