Sunday, November 22, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

महावितरणच्या तारांमधील शॉर्टसर्किटने २.२५ एकर ऊस जळून खाक; महिला शेतकरी संकटात! नुकसानभरपाईसाठी ग्रामस्थांचे रस्ता आंदोलन; तातडीने पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
October 12, 2026
in Akkalkot
0
महावितरणच्या तारांमधील शॉर्टसर्किटने २.२५ एकर ऊस जळून खाक; महिला शेतकरी संकटात! नुकसानभरपाईसाठी ग्रामस्थांचे रस्ता आंदोलन; तातडीने पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी.
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी – शिरवळवाडी(अक्कलकोट)

महावितरणच्या विद्युत तारांमधून शॉर्टसर्किट झाल्याने शिरवळवाडी येथील महिला शेतकरी लक्ष्मीबाई मल्लिकार्जुन मारलभावी यांच्या गट क्रमांक ७३/२/अ मधील तब्बल २.२५ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, नुकसानभरपाई मिळावी यासाठी ग्रामस्थांनी रस्ता आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/10/VID-20261012-WA0001.mp4

महावितरणच्या विद्युत तारांमधून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आगीत उभा ऊस जळून खाक झाल्याने महिला शेतकरी लक्ष्मीबाई मारलभावी यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. ऊस लागवड, खते, औषधे, पाणी आणि मशागतीसाठी केलेला खर्च वाया गेल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई द्या

घटनेची तातडीने दखल घेऊन जळालेल्या उसाचा अधिकृत पंचनामा करावा, नुकसानीचे योग्य मूल्यमापन करावे आणि संबंधित महिला शेतकऱ्याला नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीसाठी ग्रामस्थांनी रस्ता आंदोलन करून प्रशासन आणि महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी केली.

शेतीच्या खर्चाचा भार, त्यात आगीचे संकट

आधीच शेतीचा वाढता खर्च, पाणीटंचाई आणि विविध अडचणींमुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच मेहनतीने उभे केलेले ऊसपीक आगीत नष्ट झाल्याने मारलभावी कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने या महिला शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे.

संबंधित विभागाने या घटनेची तातडीने चौकशी करून पंचनामा पूर्ण करावा आणि नुकसानग्रस्त महिला शेतकऱ्याला योग्य नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शिरवळवाडी येथील ग्रामस्थांकडून होत आहे. आता प्रशासन आणि महावितरण या प्रकरणी किती तत्परतेने कार्यवाही करतात आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळतो का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

जनता संघर्ष न्यूज सोलापूर

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

Previous Post

हैद्रा दर्ग्याच्या देणगीबाबत संभ्रम; अन्नछत्र मंडळाचा जाहीर खुलासा.

Next Post

विक्रम (बापू )खेलबुडे यांची श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सलग १४ व्यांदा बिनविरोध निवड.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
विक्रम (बापू )खेलबुडे यांची श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सलग १४ व्यांदा बिनविरोध निवड.

विक्रम (बापू )खेलबुडे यांची श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सलग १४ व्यांदा बिनविरोध निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी नेत्ररोग, मोतीबिंदू तपासणी व...

पत्रकार सुरक्षा समितीचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. राम हुंडारे यांना जाहीर

पत्रकार सुरक्षा समितीचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. राम हुंडारे यांना जाहीर

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल. प्रतिनिधी - सोलापूर पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी राज्यभर लढा...

डफरीन चौक आयटीआयच्या आलिशा शेखची अखिल भारतीय परीक्षेत ९६ टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांकाची झेप!

डफरीन चौक आयटीआयच्या आलिशा शेखची अखिल भारतीय परीक्षेत ९६ टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांकाची झेप!

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  डफरीन चौक येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), सोलापूर येथील प्रशिक्षणार्थी आलिशा शेख हिने अखिल भारतीय व्यवसाय...

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

पंढरीच्या पावन भूमीत प्रशासनाच्या कार्याचा गौरव; लाखो वारकऱ्यांच्या सेवेला मिळाली कौतुकाची थाप!  प्रतिनिधी - पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पावन नगरीत कार्तिकी...

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा...

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

by Janta Sangharsh News
November 17, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील बोगस जातीचे दाखले तपासून ते रद्द करण्यात यावेत, तसेच पुणे...

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

by Janta Sangharsh News
November 16, 2026
0

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची सूचना; टंचाई निवारण, जलसंधारण व घरकुल योजनांचाही घेतला आढावा. प्रतिनिधी - सांगोला  पंचायत समिती...

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

औज मंद्रूप येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न; ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प! प्रतिनिधी -:औज मंद्रूप (ता. दक्षिण...

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयामार्फत बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी मार्कंडेय उद्यान, सोलापूर येथे ‘पहाट गाणी’...

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’  सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’ सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  दिवाळीचा सण केवळ दिव्यांच्या रोषणाईपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत इतरांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवण्याच्या उद्देशाने...

Load More

वेबसाईट दर्शक

0045726

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697