Monday, November 23, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यांत आज जागतिक हात धुवा दिन साजरा होणार – सीईओ कुशल जैन

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
October 15, 2026
in solapur`
0
सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यांत आज जागतिक हात धुवा दिन साजरा होणार – सीईओ कुशल जैन
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘हात धुवा नायक व्हा’ अभियानातून साबणाने हात धुण्याबाबत जनजागृती; संकल्प सेवा अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन.

प्रतिनिधी – सोलापूर

स्वच्छता ही सेवा – २०२६ आणि संकल्प सेवा अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि ग्रामपंचायतींमध्ये गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त साबणाने हात धुण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबवावेत, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या आहेत.

दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. २००८ पासून या दिवसाच्या माध्यमातून हातांच्या स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे. यंदाची संकल्पना ‘Be a Handwashing Hero’ अर्थात ‘हात धुवा नायक व्हा’ अशी आहे. संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी साबणाने योग्य पद्धतीने हात धुणे हा सोपा, प्रभावी आणि परवडणारा उपाय आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये हात स्वच्छ ठेवण्याची सवय रुजविण्यावर भर देण्यात येणार आहे.

जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुतल्यास अतिसार, पोटाचे विकार तसेच श्वसनाशी संबंधित अनेक आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. यासाठी हात धुण्याची योग्य पद्धत प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

२० सेकंद हात धुण्याची योग्य पद्धत

हात धुताना प्रथम स्वच्छ वाहत्या पाण्याने हात ओले करावेत. त्यानंतर पुरेसा साबण किंवा हँडवॉश लावून दोन्ही हातांचे तळवे, हातांची मागील बाजू, बोटांमधील जागा, नखांखालील भाग आणि मनगट किमान २० सेकंद चोळून स्वच्छ करावे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने हात धुऊन स्वच्छ टॉवेलने किंवा हवेत वाळवावेत.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामसेवकांनी आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी दिल्या आहेत. तसेच संबंधित कार्यालये, शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह जनजागृती मोहीम राबवून ‘हात धुवा नायक व्हा’ हा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवावा. या उपक्रमाचा छायाचित्रे व व्हिडिओंसह अहवाल सादर करण्याच्या सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी दिल्या आहेत.

स्वच्छ हात, निरोगी जीवन हा संदेश घराघरांत पोहोचवून स्वच्छतेची सवय दैनंदिन जीवनाचा भाग बनविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

जनता संघर्ष न्यूज, सोलापूर 

संपादक – सिद्धार्थ भडकुंबे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

Previous Post

नवरात्रीत खऱ्या नवदुर्गांचा सन्मान; आस्था रोटी बँकेची नवमातांना मायेची भेट!

Next Post

नागणसूर येथे जगद्गुरु बसलिंगेश्वर महास्वामीजींचा ९४ वा पुण्यस्मरण सोहळा; विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
नागणसूर येथे जगद्गुरु बसलिंगेश्वर महास्वामीजींचा ९४ वा पुण्यस्मरण सोहळा; विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

नागणसूर येथे जगद्गुरु बसलिंगेश्वर महास्वामीजींचा ९४ वा पुण्यस्मरण सोहळा; विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी नेत्ररोग, मोतीबिंदू तपासणी व...

पत्रकार सुरक्षा समितीचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. राम हुंडारे यांना जाहीर

पत्रकार सुरक्षा समितीचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. राम हुंडारे यांना जाहीर

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल. प्रतिनिधी - सोलापूर पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी राज्यभर लढा...

डफरीन चौक आयटीआयच्या आलिशा शेखची अखिल भारतीय परीक्षेत ९६ टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांकाची झेप!

डफरीन चौक आयटीआयच्या आलिशा शेखची अखिल भारतीय परीक्षेत ९६ टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांकाची झेप!

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  डफरीन चौक येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), सोलापूर येथील प्रशिक्षणार्थी आलिशा शेख हिने अखिल भारतीय व्यवसाय...

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

पंढरीच्या पावन भूमीत प्रशासनाच्या कार्याचा गौरव; लाखो वारकऱ्यांच्या सेवेला मिळाली कौतुकाची थाप!  प्रतिनिधी - पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पावन नगरीत कार्तिकी...

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा...

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

by Janta Sangharsh News
November 17, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील बोगस जातीचे दाखले तपासून ते रद्द करण्यात यावेत, तसेच पुणे...

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

by Janta Sangharsh News
November 16, 2026
0

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची सूचना; टंचाई निवारण, जलसंधारण व घरकुल योजनांचाही घेतला आढावा. प्रतिनिधी - सांगोला  पंचायत समिती...

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

औज मंद्रूप येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न; ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प! प्रतिनिधी -:औज मंद्रूप (ता. दक्षिण...

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयामार्फत बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी मार्कंडेय उद्यान, सोलापूर येथे ‘पहाट गाणी’...

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’  सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’ सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  दिवाळीचा सण केवळ दिव्यांच्या रोषणाईपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत इतरांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवण्याच्या उद्देशाने...

Load More

वेबसाईट दर्शक

0045793

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697