Monday, November 23, 2026
Janta Sangharsh
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
Janta Sangharsh
No Result
View All Result

नागणसूर येथे जगद्गुरु बसलिंगेश्वर महास्वामीजींचा ९४ वा पुण्यस्मरण सोहळा; विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

Janta Sangharsh News by Janta Sangharsh News
October 15, 2026
in solapur`
0
नागणसूर येथे जगद्गुरु बसलिंगेश्वर महास्वामीजींचा ९४ वा पुण्यस्मरण सोहळा; विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
0
SHARES
113
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

२२ ऑक्टोबरला रात्रभर भजनसेवा; पदयात्रा, रक्तदान शिबिर, मॅरेथॉनसह विविध स्पर्धांची भक्तांसाठी मेजवानी

प्रतिनिधी -सोलापूर 

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील श्री जगद्गुरु बसलिंगेश्वर महासंस्थान व तुप्पीनमठाच्या वतीने परमपूज्य श्री जगद्गुरु बसलिंग महास्वामीजी यांच्या ९४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागातील हजारो भाविक सहभागी होण्याची शक्यता असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जाणार आहे.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/10/VID-20261015-WA0014.mp4

श्री जगद्गुरु बसलिंग महास्वामीजी हे नागणसूर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, त्यांच्या चमत्कारिक कार्याच्या आणि लोककल्याणकारी परंपरेच्या अनेक कथा भक्तांमध्ये प्रचलित आहेत. गावाच्या संरक्षणासाठी आणि जनकल्याणासाठी समर्पित जीवन जगलेल्या या परमपूज्य शिवयोगींच्या पुण्यस्मरणानिमित्त दरवर्षी विविध सेवाभावी उपक्रम राबविले जातात.

२२ ऑक्टोबरला रात्रभर भजनसेवा

गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ वाजल्यानंतर विशेष भजनसेवेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नागणसूरसह विविध गावांतील भजनी मंडळे भक्तिमय भजन सादर करून स्वामीजींच्या चरणी सेवा अर्पण करणार आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील विविध गावांमधून भजनी मंडळे व भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/10/VID-20261015-WA0015.mp4

 

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/10/VID-20261015-WA0018.mp4

मुंबई, ठाणे, पुणे, उल्हासनगर, सोलापूर, विजयपूर, कलबुर्गी, तोडनूर, माशाळ, नाविंदगी, होसूर, करजगी, हैद्रा, कडपगाव, गौडगाव, सुलहळे, उपरवाडी, जेऊर, तोरणी, शीलवंतवाडी, गुरववाडी, मराठवाडी, शावळ, कमनहळे, भासकी, गडहिंग्लज, मंगळवेढा, यादवाड आदी भागांतील भाविक या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

https://jantasangharsh.com/wp-content/uploads/2026/10/VID-20261015-WA0017.mp4

धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांची रेलचेल

पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त विविध गावांतून पदयात्रा, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, मॅरेथॉन स्पर्धा, तुलाभार सेवा, रांगोळी स्पर्धा, वचन कंटपाट स्पर्धा, नृत्य स्पर्धा, भाषण स्पर्धा आणि बैलगाडी शर्यतीसह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांमध्ये ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, समाजसेवक, युवक मंडळे, महिला मंडळे, भजनी मंडळे आणि भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवर, राजकीय नेते आणि प्रसिद्ध कलाकारांचीही उपस्थिती लाभणार आहे.

भाविकांसाठी मोफत वाहनसेवा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

शुक्रवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी चालक व मालक संघटनेच्या सदस्यांकडून विनामूल्य वाहनसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच श्री बसव अॅक्वा व रॉयल अॅक्वा यांच्या वतीने भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची मोफत सेवा दिली जाणार आहे.

या सोहळ्याचे नियोजन आणि आयोजनासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना श्री अभिनव बसलिंग अप्पाजी, नागणसूर यांनी भाविकांना सहकुटुंब उपस्थित राहून धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. सर्व भक्तांनी तन-मनाने सेवा अर्पण करून श्री जगद्गुरु बसलिंग शिवयोगी यांच्या कृपेस पात्र व्हावे, असेही त्यांनी सांगितले.

जनता संघर्ष न्यूज, सोलापूर 

संपादक – सिद्धार्थ भडकुंबे 

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यांत आज जागतिक हात धुवा दिन साजरा होणार – सीईओ कुशल जैन

Next Post

जि. प. शाळा अंत्रोळीत जागतिक हात धुवा दिन साजरा;विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत हात धुण्याचे प्रात्यक्षिक.

Janta Sangharsh News

Janta Sangharsh News

जनता संघर्ष न्यूज' या डिजिटल न्यूज पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या बातम्या, लेख, जाहिराती तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील मजकुरातील मते, दावे आणि विचार हे संबंधित लेखक, वार्ताहर, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांचे वैयक्तिक आहेत. त्या मतांशी 'जनता संघर्ष न्यूज'चे संपादक किंवा व्यवस्थापन सहमत असेलच, असे नाही. प्रकाशित मजकुराची संपूर्ण जबाबदारी संबंधित लेखक, जाहिरातदार किंवा बातमी पुरवठादार यांची राहील. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Next Post
जि. प. शाळा अंत्रोळीत जागतिक हात धुवा दिन साजरा;विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत हात धुण्याचे प्रात्यक्षिक.

जि. प. शाळा अंत्रोळीत जागतिक हात धुवा दिन साजरा;विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत हात धुण्याचे प्रात्यक्षिक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने नेत्ररोग, मोतीबिंदू व दंतरोग तपासणी शिबिर संपन्न; ८५ रुग्णांची तपासणी.

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी नेत्ररोग, मोतीबिंदू तपासणी व...

पत्रकार सुरक्षा समितीचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. राम हुंडारे यांना जाहीर

पत्रकार सुरक्षा समितीचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार’ डॉ. राम हुंडारे यांना जाहीर

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल. प्रतिनिधी - सोलापूर पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी राज्यभर लढा...

डफरीन चौक आयटीआयच्या आलिशा शेखची अखिल भारतीय परीक्षेत ९६ टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांकाची झेप!

डफरीन चौक आयटीआयच्या आलिशा शेखची अखिल भारतीय परीक्षेत ९६ टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांकाची झेप!

by Janta Sangharsh News
November 22, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  डफरीन चौक येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), सोलापूर येथील प्रशिक्षणार्थी आलिशा शेख हिने अखिल भारतीय व्यवसाय...

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

कार्तिकी वारीच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुशल जैन यांचा सत्कार.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

पंढरीच्या पावन भूमीत प्रशासनाच्या कार्याचा गौरव; लाखो वारकऱ्यांच्या सेवेला मिळाली कौतुकाची थाप!  प्रतिनिधी - पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पावन नगरीत कार्तिकी...

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ‘युवा क्रांती कलामंच’चे घवघवीत यश; तीनही स्पर्धांत द्वितीय क्रमांक.

by Janta Sangharsh News
November 21, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा...

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

बोगस जातीच्या दाखल्यांची चौकशी व जात पडताळणी सुनावणीतील विलंबाविरोधात सोलापुरात धरणे आंदोलन.

by Janta Sangharsh News
November 17, 2026
0

 प्रतिनिधी - सोलापूर  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील बोगस जातीचे दाखले तपासून ते रद्द करण्यात यावेत, तसेच पुणे...

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

सांगोला तालुक्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी व्हावे – कुशल जैन

by Janta Sangharsh News
November 16, 2026
0

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची सूचना; टंचाई निवारण, जलसंधारण व घरकुल योजनांचाही घेतला आढावा. प्रतिनिधी - सांगोला  पंचायत समिती...

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा शुभारंभ.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

औज मंद्रूप येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न; ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प! प्रतिनिधी -:औज मंद्रूप (ता. दक्षिण...

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयातर्फे ‘पहाट गाणी’ कार्यक्रम उत्साहात.

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयामार्फत बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी मार्कंडेय उद्यान, सोलापूर येथे ‘पहाट गाणी’...

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’  सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

‘व्यसनापासून दूर राहूया, आनंदाचा दिवा लावूया!’ सारथी युथ फाऊंडेशनचा सोलापुरात अनोखा दिवाळी उपक्रम; नृत्य, खेळ आणि जनजागृतीतून व्यसनमुक्तीचा संदेश

by Janta Sangharsh News
November 12, 2026
0

प्रतिनिधी - सोलापूर  दिवाळीचा सण केवळ दिव्यांच्या रोषणाईपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत इतरांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवण्याच्या उद्देशाने...

Load More

वेबसाईट दर्शक

0045793

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697