
प्रतिनिधी – अंत्रोळी
जिल्हा परिषद शाळा अंत्रोळी येथे जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना स्वच्छता आणि आरोग्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. यावेळी दैनंदिन जीवनात हात स्वच्छ ठेवण्याची गरज स्पष्ट करून योग्य पद्धतीने हात कसे धुवावेत, याचे प्रात्यक्षिक शिक्षकांमार्फत देण्यात आले.हातांची स्वच्छता राखल्यामुळे विविध आजारांचा प्रसार रोखण्यास मदत होते. त्यामुळे जेवणापूर्वी, शौचालयाचा वापर केल्यानंतर तसेच हात अस्वच्छ झाल्यावर साबणाने हात धुण्याची सवय विद्यार्थ्यांनी अंगीकारावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रसंगी श्रीरंग बनसोडे, नागनाथ म्हमाणे, मीनाक्षी राठोड, सुषमा कुंभार आदी उपस्थित होते.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

















