पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना निवेदन
प्रतिनिधी – सोलापूर

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या एक महिन्याच्या मानधनाची रक्कम दुष्काळ निधीसाठी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या निर्णयासंदर्भात जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कुशल जैन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले. या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा आणि अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत रुक्मिणी गुलचंद्र पवार, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती मा. चेतनसिंह केदार-सावंत, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती मा. रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीमती अमृता वाघ, उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती सौ. तेजस्विनी ताई बोराडे, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे सभापती मा. संदीप टेळे, मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापती सौ. दिपालीताई आनंद ताड, जिल्हा परिषद सदस्य मा. रमेश भांजे, सौ. चैत्राली ताई मुळे आणि मा. सिद्धाराम शिवमुर्ती आदी मान्यवर उपस्थित होते.
“शेतकऱ्यांच्या संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे, हीच खरी लोकसेवा!” या भावनेतून घेण्यात आलेला हा निर्णय सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

















