
प्रतिनिधी – सोलापूर
शहरातील नामांकित नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या शर्व बिराजदार आणि सोहम जाधव या विद्यार्थ्यांनी शालेय शहरस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशामुळे दोन्ही विद्यार्थ्यांची नगर येथे होणाऱ्या विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत सोमपा क्रीडा कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, अष्टपैलू खेळ आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली. त्यांच्या या कामगिरीमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमारदादा करजगी, संस्थेच्या सचिव सौ. वर्षाताई विभुते, शाळेचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, मार्गदर्शिका मीना पारखे आणि प्राचार्या रश्मी कुंभार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा विभागप्रमुख आनंद लिगाडे आणि ज्ञानदीप जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

















