
प्रतिनिधी – अक्कलकोट (जेऊर)
विजयपूर जिल्ह्यातील आलमेल येथील विश्वेश्वर बालभारती शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मीपुत्र किरणळ्ळी यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कर्नाटक राज्य अनुदानित प्राथमिक शाळा शिक्षक संघ, बेंगळुरू यांच्या वतीने रविवारी कंदगल हनुमंतराय रंगमंदिरात आयोजित राज्यस्तरीय शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.विधान परिषदेचे माजी सभापती व माजी शिक्षणमंत्री बसवराज होरट्टी, मंत्री रुद्रप्पा लमाणी, आमदार हनुमंत निराणी, चंद्रशेखर नुग्गली, जी. हनुमंतप्पा, संघाचे राज्याध्यक्ष शिवानंद हिरेकुरूबर, राज्य सरचिटणीस एम. के. राजू, जिल्हाध्यक्ष गिरीश बिरादार, सार्वजनिक शिक्षण विभागाचे जिल्हा संचालक मंजुनाथ गुळेदगुड्ड तसेच गटशिक्षणाधिकारी आर. व्ही. होसूर आदी मान्यवरांच्या हस्ते किरणळ्ळी यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या सन्मानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष एस. आय. जोगूर, सचिव प्रशांत बडदाळ, संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि शिक्षकवृंद यांनी आनंद व्यक्त करून लक्ष्मीपुत्र किरणळ्ळी यांचे अभिनंदन केले.दरम्यान, किरणळ्ळी यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या जन्मगावी जेऊर येथेही आनंदाचे वातावरण होते. पांडुरंग महाराज, कुलस्वामिनी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने तसेच त्यांच्या मोठ्या मित्रपरिवाराकडून त्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240















