
प्रतिनिधी – सोलापूर
७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सिद्धार्थ मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, मोदी, सोलापूर यांच्या वतीने सर्व बौद्ध बांधवांसह नागरिकांसाठी धम्म भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ गवळी यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, सोलापूरचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विकजी जयकर तसेच डॉ. मनीषा जनार्दन शिंदे यांच्या शुभहस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित बौद्ध बांधव आणि भगिनींना धम्म भोजनाचे वाटप सुरू करण्यात आले. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आल्याने या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
या उपक्रमाबद्दल अधिष्ठाता डॉ. ऋत्विकजी जयकर यांनी संस्थेचे मनःपूर्वक कौतुक केले. तसेच संस्थेच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















