
पंचशील ध्वजारोहण, बुद्ध वंदना आणि सामूहिक बौद्ध वंदनेतून समता, बंधुता व मानवतेचा संदेश
दुधनी : प्रतिनिधी — निंगप्पा निंबाळ
दुधनी, ता. अक्कलकोट येथील भीमनगरमध्ये ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व विजयादशमी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पंचशील ध्वजारोहण आणि सामूहिक बौद्ध वंदनेच्या माध्यमातून समता, बंधुता, करुणा व मानवतेचा संदेश देण्यात आला.
त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनचे मॅनेजर राजू सर आणि अक्कलकोट येथील आयडीएफ अरे फायनान्सचे मॅनेजर रेवणसिद्ध वाघमारे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सामूहिक बौद्ध वंदना घेऊन भगवान गौतम बुद्धांच्या विचारांना अभिवादन केले. संपूर्ण परिसरात मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतीय इतिहासातील सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारा महत्त्वपूर्ण दिवस आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो.
मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, शंकर शिंगे, पिंटू लोड्डेन, पत्रकार निंगप्पा निंबाळ, खाजप्पा शिंगे, लक्ष्मण मगी, रमेश शिंगे, गुरु धोंडामनी, संतोष जन्ना, धर्म शिंगे, गौतम झळकी, लक्ष्मण रेऊर, शरणाप्पा बसवनकेरी, जयभीम बळुंडगी, विश्वास मगी, जयभीम निंबाळ, रन्ना सिन्नूर, राहुल झळकी, विश्वनाथ रेऊर, मुत्ताण गायकवाड, भीमा झळकी, उत्तम निंबाळ, शंतू जन्ना, महेश झळकी, काशिनाथ रेऊर, सम्राट झळकी, तथागत झळकी, अशोक बळुंडगी, बसू मड्याळ, राजू जन्ना, रवी परमशेट्टी, गोरखनाथ धोंडमनी, पिंटू शिंगे यांच्यासह भीमनगर व दुधनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240















