
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेत अन्नदान व सेवाकार्याची घेतली माहिती
प्रतिनिधी – अक्कलकोट

‘सकाळ’ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. अभिजित पवार यांनी आज श्री क्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास सदिच्छा भेट देऊन मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या विविध सेवाकार्यांची माहिती जाणून घेतली.

यावेळी अन्नछत्र मंडळाच्या दैनंदिन अन्नदान उपक्रमासह न्यासाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व सेवाभावी कार्यांची माहिती त्यांना देण्यात आली. मंडळाच्या वतीने भाविकांसाठी सुरू असलेल्या अन्नदान व इतर सेवाकार्यांचे त्यांनी कौतुक केले आणि या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

या सदिच्छा भेटीच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सेवाभावी कार्याची माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















