समर्थ सहकारी बँकेचे नूतन संचालक अमित कामतकर यांचे श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दर्शन; मंदिर समितीच्या वतीने सत्कार
प्रतिनिधी – अक्कलकोट,

“मी आणि माझे कुटुंबीय श्री स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त आहोत. महाराजांच्या कृपेनेच मला समर्थ सहकारी बँकेच्या संचालकपदाची जबाबदारी मिळाली आहे,” असे मनोगत समर्थ सहकारी बँकेचे नूतन संचालक अमित कामतकर यांनी व्यक्त केले.
सोलापूर येथील समर्थ सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर अमित कामतकर यांनी सहकुटुंब श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन महेश मालक इंगळे यांनी नूतन संचालक अमित कामतकर यांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचे कृपावस्त्र, प्रसाद आणि प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.यावेळी बोलताना अमित कामतकर म्हणाले, “संचालकपद हे माझ्यासाठी केवळ सन्मानाचे पद नसून मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारे आहे. ग्राहकांच्या विश्वासावर बँक उभी आहे. हा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने माझ्या हातून ही सेवा घडावी, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना केली आहे.”
या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, दत्ता कटारे, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव यांच्यासह कामतकर कुटुंबीय उपस्थित होते.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240















