खासदार पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या हस्ते गौरव; जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. कटारिया यांची प्रमुख उपस्थिती.

प्रतिनिधी – सोलापूर
सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती झाल्याबद्दल अॅड. आनंद कुर्डूकर तसेच सोलापूर येथे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून रुजू झाल्याबद्दल अॅड. आनंद नरखेडकर यांचा सत्कार करण्यात आला.


महाराष्ट्र शासनाचे विशेष सरकारी वकील तथा खासदार पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या हस्ते दोन्ही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. कटारिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सत्कार सोहळ्यावेळी सोलापूर बार असोसिएशनचे सदस्य तसेच वकील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही वकिलांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे न्याय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत दोन्ही नवनियुक्त सरकारी वकिलांचा गौरव करण्यात आला.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

















